Walking in Diabetes : जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही शुगर नियंत्रित ठेवू शकता. त्यामुळे एक्सपर्ट सांगतात की, डायबिटीसच्या रूग्णांनी जास्तीत जास्त चाललं पाहिजे. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, पायी चालून खरंच शुगर कमी किंवा कंट्रोल होते का? चला तर जाणून घेऊ याचं उत्तर...
पायी चालून शुगर कमी होते?
अमेरिकन डायबिटीस असोसिएशन (American Diabetes Association) नुसार, डायबिटीसच्या रूग्णांनी अॅक्टिव राहणं फार गरजेचं असतं. शुगर असेल तर अॅक्विट राहून तुम्ही शुगर कंट्रोल करू शकता. सुस्त जीवनशैली डायबिटीसचा धोका अधिक वाढवते. मुळात डायबिटीसचे रूग्ण जेवढं जास्त चालतील तेवढी त्यांची शुगर लेव्हल कमी होते.
पायी चालण्याचा कसा पडतो प्रभाव?
वेगानं चालल्यास पॅनक्रियाजचे सेल्स वेगानं कमी होण्यास मदत मिळते. या पद्धतीनं शुगर मेटाबॉलिज्म बूस्ट करते आणि अन्नातून शुगर लवकर पचवून रक्तात याचं प्रमाण वाढण्यापासून रोखता येते. पायी चालल्यानं नेहमीच तुमची शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.
डायबिटीसमध्ये किती पायी चालावं?
अमेरिकन डायबिटीस असोसिएशननुसार, रोज किमान १० हजार पावलं किंवा कमीत कमी ३० मिनिटं पायी चालायला हवं. यानं तुमची शुगर लेव्हल कंट्रोल होते. जर तुम्हाला एकदम ३० मिनिटं चालणं अवघड जात असेल तर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी चालण्याचा वेळ विभागून घ्या. तसेच डाएटमध्येही बदल करा. कार्ब्स पचवण्यासाठी जास्त चालण्याची गरज असते. पायी चालताना स्पीड एकसारखा असणं फार गरजेचं असतं.