Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस नाहीतर दिसाल वयाआधीच म्हातारे - एक्स्पर्ट सांगतात कारणं...

वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस नाहीतर दिसाल वयाआधीच म्हातारे - एक्स्पर्ट सांगतात कारणं...

Can Stress Cause Early Ageing In Women : stress and early ageing in women : can stress cause early ageing in women expert tells : ज्या महिला जास्त स्ट्रेस घेतात, त्यांच्यामध्ये वयाच्या आधीच त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात, खरं का खोटं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 14:46 IST2025-07-22T14:33:08+5:302025-07-22T14:46:05+5:30

Can Stress Cause Early Ageing In Women : stress and early ageing in women : can stress cause early ageing in women expert tells : ज्या महिला जास्त स्ट्रेस घेतात, त्यांच्यामध्ये वयाच्या आधीच त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात, खरं का खोटं ?

Can Stress Cause Early Ageing In Women stress and early ageing in women can stress cause early ageing in women expert tells | वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस नाहीतर दिसाल वयाआधीच म्हातारे - एक्स्पर्ट सांगतात कारणं...

वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस नाहीतर दिसाल वयाआधीच म्हातारे - एक्स्पर्ट सांगतात कारणं...

सध्या बऱ्याचजणींना चेहऱ्यावर वय व्हायच्याआधीच एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या सतावते. ऐन तारुण्यात अशा प्रकारे चेहऱ्यावर जर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या तर ती अनेकींसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरु शकते. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी बहुतेकजणी अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स (Can Stress Cause Early Ageing In Women) किंवा क्रीम्सचा वापर करतात. याशिवाय, अँटी-एजिंग प्रॉडक्ट्स, डाएट्स आणि सप्लिमेंट्सही घेतले जातात. मात्र, जोपर्यंत शरीर आतून स्वस्थ होत नाही, तोपर्यंत त्वचेवरील एजिंगच्या खुणा काही केल्या कमी होतंच नाहीत. आपल्या डेली रुटीनमधील (stress and early ageing in women) काही सवयी देखील त्वचेवरील एजिंगचे कारण ठरतात. यामध्ये जंक फूड खाण्याची सवय, स्मोकिंग करणे, प्रोसेस्ड फूड खाणे आणि जास्त साखर घेणे अशा सवयींचा समावेश होतो(can stress cause early ageing in women expert tells).

आपण बरेचदा ऐकतो की, स्ट्रेस घेतल्याने चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा वाढतात आणि आपण वय होण्याआधीच म्हातारे दिसू लागतो.  ज्या महिला जास्त ताण घेतात, त्यांच्यामध्ये वयाच्या आधीच, खूप लवकर त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. पण खरंच असं होतं का? की हा केवळ एक समज आहे? या विषयावर  यशोदा हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सारदा एम यांनी onlymyhealth.com ला अधिक माहिती दिली. 

१. जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे महिलांच्या त्वचेवर एजिंगच्या खुणा लवकर दिसतात का?

स्ट्रेसचा थेट परिणाम आपल्या शरीरातील पेशींच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे महिलांमध्ये बायोलॉजिकल एजिंगची प्रक्रिया अधिक वेगाने घडते. सतत तणावात राहिल्यामुळे शरीरात कोर्टिसोल या तणाववर्धक हार्मोनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील वाढतो. यामुळे शरीरात इंफ्लेमेशन वाढतो आणि त्याचे परिणाम त्वचेवर आणि शरीरावर वृद्धत्वाच्या खुणांमधून दिसू लागतात. क्रॉनिक स्ट्रेस म्हणजेच दीर्घकाळ स्ट्रेस घेतल्याने केवळ बायोलॉजिकल एजिंग वाढवत नाही, तर पेशींच्या नुकसानालाही हा स्ट्रेस कारणीभूत ठरतो. यामुळे शरीरात सतत सूज आणि विविध आजारांचा धोका वाढतो. 

९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

२. स्ट्रेस आपल्या एजिंगवर कसा परिणाम करतो ? 

 दीर्घकाळ स्ट्रेस घेतल्यामुळे शरीरात पेशींचे नुकसान आणि शरीराच्या कार्यात बिघाड होतो. यामुळे पेशींना दुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि त्वचेचंही मोठं नुकसान होतं. ज्या महिलांना दीर्घकाळ तणावाचा सामना करावा लागतो, त्यांच्यामध्ये एजिंगच्या खुणा लवकर आणि स्पष्टपणे दिसू लागतात. वय वाढल्यावर चेहऱ्यावर येणारे डाग, सुरकुत्या, त्वचेचा मऊपणा कमी होणे यासारख्या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कोर्टिसोल हार्मोनचा स्तर अधिक असतो, त्यामुळे महिलांमध्ये एजिंगची लक्षणं ही पुरुषांच्या तुलनेत अधिक लवकर दिसून येतात.

गुडघेदुखीचा त्रास-सांध्यांतून कट-कट आवाज येतो? डॉक्टर सांगतात५ उपाय -  दुखणे होईल कमी...

ऑफर आहे म्हणून सुपर मार्केटमधून ढिगभर वस्तू आणता? ‘ही’मोठी चूक, देतेय आजारांना आमंत्रण... 

३. स्ट्रेसमुळे महिलांमध्ये एजिंगची कोणती लक्षणं दिसतात ?

१. स्ट्रेसमुळे त्वचेत कोरडेपणा येतो आणि सुरकुत्या लवकर पडतात. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेज हरवते आणि ती निस्तेज व डल दिसते, जे एजिंगचं मुख्य लक्षण आहे.

२. वाढत्या वयात केस पातळ होऊ ते अधिक गळू लागतात. त्यांची चमकही कमी होते, ज्यामुळे केसांवर वृद्धत्वाचा परिणाम स्पष्ट दिसतो.

३. वय वाढल्यावर महिलांमध्ये झोप न लागणे, रात्री वारंवार जाग येणे किंवा दिवसभर आळस वाटणे हे झोपेसंबंधित त्रास वाढतात. स्ट्रेसमुळे ही लक्षणं आणखी तीव्र होतात.

४. वाढत्या वयात हाडांची मजबुती कमी होते आणि सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्याचबरोबर पचनसंस्थाही कमजोर होते, त्यामुळे अन्न नीट न पचणे, गॅस, अपचन अशा समस्या होतात.

५. दिवसभर थकवा जाणवणे, शरीरात ऊर्जा न राहणे आणि सतत अशक्तपणा वाटणे ही वृद्धत्वाची लक्षणं आहेत. स्ट्रेसमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते, आणि त्यामुळे कामात उत्साह वाटत नाही.

Web Title: Can Stress Cause Early Ageing In Women stress and early ageing in women can stress cause early ageing in women expert tells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.