Join us
Daily Top 2 Weekly Top 5

रोज एक तास जास्त झोपल्यानं शरीरात काय होतं? संशोधनातून समोर आला महत्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:28 IST

Sleeping 1 Extra Hour Dail : जर आपण आपल्या गरजेपेक्षा दररोज 1 तास जास्त झोपलो, तर काय होईल? यावर युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिनाने एक रिसर्च केला आहे. पाहूया या अभ्यासात काय निष्कर्ष आले.

Sleeping 1 Extra Hour Daily: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे हे आपण सगळेच जाणतो. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स दररोज 8–9 तास झोप घेण्याचा सल्ला देतात. पण एक प्रश्न अनेकांना पडतो की, जर आपण आपल्या गरजेपेक्षा दररोज 1 तास जास्त झोपलो, तर काय होईल? यावर युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिनाने एक रिसर्च केला आहे. पाहूया या अभ्यासात काय निष्कर्ष आले.

रोज जास्त झोप घेतल्याने काय होते?

या रिसर्चमध्ये 36 लोकांचा समावेश केला गेला. त्यांना 2 गटात विभागले. दोन्ही ग्रुपला 8 आठवडे एकसारखी डाएट दिली गेली आणि सर्वांना कॅलरी डेफिसिटमध्ये ठेवले गेले, म्हणजे जितक्या कॅलरी खाल्ल्या त्यापेक्षा जास्त खर्च केल्या. फरक फक्त एवढाच होता की, पहिला ग्रुप दररोज 1 तास जास्त झोप घेत होता तर  दुसरा ग्रुप दररोज 1 तास कमी झोप घेत होता. 

8 आठवड्यांनंतर आलेले निष्कर्ष

दोन्ही ग्रुपचे वजन कमी झाले होते, पण वजन कमी होण्याचं कारण मात्र वेगळं होतं. जास्त झोपणाऱ्या लोकांमध्ये वजनातील 83% घट ही बॉडी फॅट कमी झाल्यामुळे होती. म्हणजे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी झाल्याने वेट लॉस झाला हा हेल्दी वेट लॉस आहे. कमी झोपणाऱ्या लोकांमध्ये वजनातील 85% घट ही मसल्स कमी झाल्यामुळे होती. म्हणजे त्यांचे वजन चुकीच्या पद्धतीने कमी झाले आणि शरीर कमकुवत झाले.

कमी झोप घेतल्याचे नुकसान

रिसर्चमध्ये स्पष्ट झाले की दररोज फक्त 1 तासाची कमी झोपही शरीरावर मोठा परिणाम करते.

स्ट्रेस वाढतो

हार्मोन्स बिघडतात

फॅट बर्न होणे धीमे होते

जास्त भूक लागते

वजन परत वाढण्याची शक्यता वाढते

शरीर थकल्यासारखे वाटते

पूर्ण झोप घेतल्याचे फायदे

जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा शरीर स्वतःला रिपेअर करतं, नवीन मसल्स तयार होतात. शरीराची एनर्जी वाढते. पण झोप कमी झाली तर या सगळ्या प्रोसेस थांबतात आणि शरीर हळूहळू कमकुवत होऊ लागतं. डाएट आणि एक्सरसाईजसोबत दररोज 8-9 तासांची झोप इतकीच महत्त्वाची आहे. कधी कधी 1 तास जास्त झोप देखील शरीराला मजबूत, तंदुरुस्त आणि ताजेतवाने बनवू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : One Extra Hour of Sleep: Research Reveals Body Benefits

Web Summary : Sleeping one extra hour daily boosts fat loss, unlike sleep deprivation, which reduces muscle mass. Adequate sleep repairs the body, increases energy, and prevents weight regain. Prioritizing sleep alongside diet and exercise is crucial for health.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स