Join us
Daily Top 2 Weekly Top 5

खाऊ की नको...शुगर तर नाही ना वाढेल... डायबिटीसच्या रूग्णांनी दही खावं की नाही? पाहा एक्सपर्टचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:14 IST

Curd In Diabetes : काय खावे काय खाऊ नये? हा डायबिटीस असलेल्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. म्हणजे काळजी न घेता जर काहीही खाल्लं तर त्याचा प्रभाव थेट ब्लड शुगरवर पडतो.

Curd In Diabetes : डायबिटीस म्हणजे मधुमेह हा एक असा आजार आहे, जो एकदा जर झाला तर मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. म्हणजे हा आजार फक्त कंट्रोल केला जाऊ शकतो, त्याला पूर्णपणे बरा करता येत नाही. शुगर वाढू नये किंवा कमी होऊ नये यासाठी डायबिटीस झालेल्यांना आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. काय खावे काय खाऊ नये? हा डायबिटीस असलेल्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे. म्हणजे काळजी न घेता जर काहीही खाल्लं तर त्याचा प्रभाव थेट ब्लड शुगरवर पडतो. डायबिटीस असलेल्यांना नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे त्यांनी दही खावं की नाही. अशात डायटिशिअनकडून जाणून घेऊया की, शुगरचे रूग्ण दही खाऊ शकतात का. जर खाऊ शकत असतील तर कसं खावं आणि कधी खावं. 

डायबिटीसचे रूग्ण दही खाऊ शकतात का? 

डायटिशिअन स्वाती सिंह यांनी एका वेबसाइटला सांगितलं की, दह्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे ते डायबिटीसच्या रूग्णांसाठी चांगलं ठरतं. दही फार हेल्दी असतं, त्यात प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि व्हिटामिन डी असतं. दह्यात कार्बोहायड्रेट कमी आणि प्रोटीन जास्त असतं. तसेच दही हे एक नॅचरल प्रोबायोटिक आहे, जे इम्यून सिस्टीम मजबूत ठेवतं. पोटाचं आरोग्य देखील दह्याने चांगलं राहतं. त्यामुळे डायबिटीसचे रूग्ण दही आरामात खाऊ शकतात. फक्त दही खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहिती असणं गरजेचं आहे. 

दही खाण्याची योग्य वेळ

आयुर्वेदात दही रात्री खाणं चांगलं मानलं जात नाही. रात्री दही खाल्लं तर कफ होण्याचा धोका असतो. तसेच उपाशीपोटी दही खाल्ल्यास पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे दह्यात असणारे लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया नष्ट होतात आणि अॅसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे दही कधीही उपाशीपोटी आणि रात्री खाऊ नये. दिवसा जेवणासोबत दही खाणं सगळ्यात चांगलं मानलं जातं.

कसं खावं दही?

टाइट २ डायबिटीसच्या रूग्णांसाठी प्रोबायोटिक दही जास्त चांगलं मानलं जातं. शुगरच्या रूग्णांनी दही ताजं आणि साखर न घालता खावं. हवं तर दह्याचं ताक करूनही पिऊ शकता. दह्यात साखर किंवा मध घालून खाणं आयुर्वेदात चांगलं मानलं जातं. पण डायबिटीसच्या रूग्णांनी असं करणं टाळलं पाहिजे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Curd for Diabetics: Yes or No? Expert Advice on Eating Yogurt

Web Summary : Diabetics can eat curd due to its low glycemic index. It's best consumed during the day with meals, not at night or on an empty stomach. Avoid adding sugar; plain or as buttermilk is recommended for type 2 diabetics.
टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य