केसांना तेल लावणे ही आपल्या भारतीय परंपरेतील एक सोपी आणि आरोग्यदायी सवय आहे. आजही आजी-आई आपल्या केसांच्या सौंदर्याचे रहस्य विचारल्यास त्या एकच गोष्ट सांगतात, नियमित तेल लावा. (Can applying oil to hair be dangerous? Before applying oil, see what mistakes to avoid)खरंच, तेल केसांना पोषण देते, मुळांना बळकटी देते आणि केसांना मऊ, चमकदार ठेवते. मात्र तेल लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे, कारण चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यास फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊ शकते.
सर्वात प्रथम, तेल निवडताना आपल्या केसांच्या प्रकारानुसार योग्य तेल निवडावं. कोरड्या केसांसाठी खेबरेल, बदाम किंवा इतर तेल तज्ज्ञांच्या सल्याने वारणे उत्तम ठरते. मात्र सगळ्यांचीच त्वचा सारखी नही. जर मुळात त्वचा फार तेलकट असेल तर तेल लावणे त्रासदायक ठरते. केसांना जरा कोमट तेल लावावे. त्याचे अनेक फायदे असतात. कारण कोमट तेल टाळूमध्ये लवकर शोषलं जातं आणि मुळांपर्यंत पोहोचतं. हे केसांच्या वाढीस मदत करतं तसेच रक्ताभिसरण सुधारतं. डोक्यालाही आराम मिळतो.
तेल लावताना टाळूवर हलके मालीश करावे. जोरात चोळल्याने केस गळू शकतात किंवा मुळे सैल होऊ शकतात. हलक्या हाताने बोटे गोलाकार फिरवत मसाज केल्यास टाळूतील रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची वाढ चांगली होते.
पण हे लक्षात ठेवा की अतिरिक्त तेल लावणे टाळायला हवे. खूप तेल लावल्याने ते नीट धुतले जात नाही, त्यामुळे टाळूवर चिकटपणा आणि घाण साचते. यामुळे केस चिकट होतात, कोंडा होतो आणि त्वचा म्हणजेच कपाळ व चेहरा तेलकट व्हायला लागतो. काही वेळा त्यामुळे पिंपल्सही येतात. तेल कितीही फायद्याचे असले तरी ते प्रमाणातच वापरावे. तसेच जास्तीत जास्त १ ते २ तास ठेवल्यानंतर सौम्य शॅम्पूने धुवावे. रात्रभर तेल लावणे सगळ्यांनाच सुट करत नाही. रात्रभर तेल ठेवायचं असल्यास ते फक्त आठवड्यातून एकदा करा, रोज नाही. तसेच ओल्या केसांना तेल लावू नये, कारण त्या अवस्थेत केस जास्त नाजूक असतात.
थोडक्यात सांगायचं तर, तेल लावणं म्हणजे केसांना पोषण देणं, पण त्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. कोमट तेल, हलका मसाज, मर्यादित प्रमाण आणि योग्य वेळ या चार नियमांचे पालन केले तर, तुमचे केस नेहमी काळेभोर, मजबूत आणि निरोगी राहतील.
Web Summary : Oiling nourishes hair, but improper application can harm it. Use lukewarm oil, massage gently, avoid excess, and shampoo after 1-2 hours. Over-oiling causes scalp build-up and pimples. Oiling should be done correctly for healthy hair.
Web Summary : तेल बालों को पोषण देता है, लेकिन गलत तरीके से लगाने से नुकसान हो सकता है। गुनगुना तेल लगाएं, धीरे से मालिश करें, अधिक तेल लगाने से बचें और 1-2 घंटे बाद शैम्पू करें। ज़्यादा तेल लगाने से रूसी और पिंपल्स होते हैं। स्वस्थ बालों के लिए तेल सही तरीके से लगाना चाहिए।