Health Tips : शिंका येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. धूळ, प्रदूषण, बाहेरील कण नाकात गेल्यावर ते बाहेर काढण्याची ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. शिंका येणं ही सामान्य बाब असली तरी काही स्थितींमध्ये जोरात किंवा चुकीच्या पद्धतीनं शिंकल्यानं आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होऊ शकते. जी जीवघेणी ठरू शकते. शिंकल्यामुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
कोणत्या स्थितीत शिंकणं घातक
मेंदुमध्ये ब्लीडिंग
फार जास्त जोरात शिंकल्यामुळे मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये अचानक दबाव वाढू शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मेंदुत आधीच एखादी रक्तवाहिका कमजोर असेल किंवा रक्तवाहिनेत फुग्यासारखी सूज असेल तर शिंकल्यामुळे ती फाटू शकते. ज्यामुळे मेंदुत रक्तस्त्राव होऊ शकतो. ज्याला सेरेब्रल हॅमरेज म्हणतात. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
मणका मोडणे
जास्त रोज लावून किंवा पुन्हा पुन्हा शिंका येत असेल तर मणक्यावर दबाव पडून मोडूही शकतो. ज्या लोकांची हाडं कमजोर आहेत त्यांच्यासोबत हे अधिक होऊ शकतं. जसे की, ऑस्टियोपोरोसिसचे रूग्ण आणि वृद्ध. मोडलेल्या मणक्यामुळे फुप्फुसं किंवा आजूबाजूच्या अवयवांचं नुकसान होऊ शकतं.
फुप्फुसं फाटणे
फार जोरात शिंकल्यानं फुप्फुसांमध्ये हवेचा दबाव अचानक वाढतो. एखाद वेळेस फुप्फुसाचा छोटासा भाग फाटू शकतो. ज्यामुळे हवा फुप्फुसं आणि छातीच्या मधे जमा होते. याला न्यूमोथोरॅक्स म्हणतात. या स्थितीत श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. त्यामुळे ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
घसा किंवा छातीत जखम
जर एखादी व्यक्ती शिंक थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर घशात किंवा छातीत हवेचा खूप जास्त वाढू शकतो. यानं घशात रक्तवाहिन्या किंवा वायुमार्गात इजा होऊ शकते. काही केसेसमध्ये अन्ननलिका किंवा वायुनलिकेचंही नुकसान होऊ शकतं.
मानेला इजा
अचानक आणि जोरात शिंकल्यानं मानेचे स्नायू किंवा लिगामेंट्समध्ये तणाव वाढू शकतो किंवा इजा होऊ शकते. पण ही स्थिती जीवघेणी नसते. पण यात असह्य वेदना आणि अस्वस्थता जाणवते.
शिंक आल्यावर काय करावे काय करू नये?
शिंक थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. जेव्हा शिंका येईल तेव्हा स्वाभाविकपणे येऊ द्या. यावेळी नाक आणि तोंड दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण यामुळे शरीरात दबाव वाढू शकतो.
शिंकताना नाक आणि तोंडावर रूमाल लावा किंवा नाक-तोंडावर हात ठेवा. असं केल्यानं दुसऱ्यांना इन्फेक्शन होणार नाही. तसेच दबावही कमी होईल.
धूळ आणि अॅलर्जीपासून बचाव करा. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर अशा गोष्टींपासून दूर रहा ज्यामुळे तुम्हाला शिंका येतात.
निरोगी आणि फिट रहा. आपली हाडं आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. नियमितपणे व्यायाम करा.
जर शिंकल्यानंतर अचानक डोकं जास्त दुखत असेल, छातीत वेदना होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा शरीराच्या एखाद्या भागात कमजोरी जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.
शिंका येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे आणि याना घाबरण्याची गरज नाही. पण जर काही असामान्य जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.