सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये,सांधेदुखी होणे ही फारच कॉमन समस्या बनली आहे. वाढत्या वयोमानानुसार, सांधेदुखी होणे सामान्य आहे परंतु आजकाल (which seeds are good for bones) ऐन तारुण्यात देखील बऱ्याचजणांना सांधेदुखीची समस्या सतावते. कामाचे जास्त तास, बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा अभाव या सगळ्या (calcium-rich seeds for healthy bones) गोष्टींमुळे सांधे दुखण्याची समस्या अधिक त्रासदायक ठरु शकते. सांधे दुखत असताना कोणतेही काम करणे कठीण होते आणि त्यामुळे त्याचा आपल्या डेली रुटीनवर वाईट परिणाम होतो(which seeds are good for bones calcium rich seeds for healthy bones).
सतत होणाऱ्या सांधेदुखीमुळे हा त्रास एका ठराविक काळाने नकोसा वाटू लागतो. वारंवार होणाऱ्या या सांधेदुखीच्या समस्येकडे वेळीच योग्य ते लक्ष दिले नाही तर ही लहान वाटणारी समस्या गंभीर रुप धारण करु शकते. सांधेदुखी ही कधी तात्पुरती असते तर कधी दीर्घकाळ सतावते, या समस्येचा त्रास कमी करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय देखील करू शकतो. सांधेदुखीवर (calcium rich seeds for strong bones) घरगुती उपाय करण्यासाठी आपण रोजच्या आहारात, दह्यात ३ प्रकारच्या बिया कालवून खाऊ शकतो. सांधेदुखीवर हा घरगुती उपाय केल्यास आपल्याला बराच आराम मिळतो. सांधेदुखी कमी करण्यासाठी दह्यात कोणते ३ पदार्थ कालवून खावेत ते पाहूयात...
सांधेदुखी कमी करण्यासाठी दह्यात कालवून खा ३ पदार्थ...
१. अळशीच्या बिया (Flax Seeds) :- अळशीच्या बिया मधुमेह आणि संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी खूपच फायदेशीर मानल्या जातात. अळशीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्य होते. याव्यतिरिक्त, अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे शरीरात गुड फॅट्स म्हणून काम करते आणि संधिवात असलेल्यांची सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते. अळशीच्या बिया भाजून आणि बारीक करून, दिवसातून एक किंवा दोन वेळा दह्यात कालवून खाणे फायदेशीर ठरते. यामुळे सांधेदुखी आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते.
२. भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) :- भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या बिया संधिवाताची लक्षणे कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात. भोपळ्याच्या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे त्या डायबिटीज असणाऱ्यांसाठी देखील सुरक्षित आणि फायदेशीर आहेत. भोपळ्याच्या बिया कच्च्या किंवा भाजून, दह्यात मिसळून खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि हाडे मजबूत होतात.
३. सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) :- सूर्यफुलाच्या बिया सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. विशेषतः मधुमेह आणि सांधेदुखी असलेल्यांसाठी या बिया फायदेशीर आहेत. सूर्यफुलाच्या बियांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे सांधेदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळतो. या बियांमध्ये भरपूर हेल्दी फॅट आणि फायबर असतात. त्यामुळे या बिया कच्च्या किंवा भाजून, दह्यात मिसळून खाल्ल्याने सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.