Join us

कोबीतल्या अळ्या आरोग्यासाठी घातक, मेंदूलाही येऊ शकते सूज- डॉक्टर सांगतात सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:30 IST

Cabbage Worms Are Harmful : हिवाळ्याच्या दिवसांत ताज्या भाज्या खायला मिळतात पण अनेक भाज्यांमध्ये किडे असतात जे सहजासहजी दिसत नाहीत.

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसायला सुरूवात झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसांत मेथी, पालक, मेथी, चवळी, बीट, मूळा,  पत्ताकोबी, मटार आणि फुलकोबी या भाज्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. हिवाळ्याच्या दिवसांत ताज्या भाज्या खायला मिळतात पण अनेक भाज्यांमध्ये किडे असतात जे सहजासहजी दिसत नाहीत. (Cabbage Worms Harmful To Hummans Neurologist Explained What Is Cabbage Worms And How To Prevent)

खासकरून पत्ताकोबीत बरेच किडे असतात. अशा भाज्यांचे सेवन तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकते. ज्यामुळे मेंदूमध्ये सूज येते आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पत्ताकोबीतील किड्यांमुळे तब्येतीचे काय नुकसान होते ते समजून घ्यायला हवं. पत्ताकोबीतील किड्यांना वैज्ञानिक पियरिस रॅपे असंही म्हणतात. हे किडे कॅटरपिलर, पत्ताकोबी, ब्रोकोली, केल आणि अन्य पदार्थ खातात.  ज्यामुळे पानांमध्ये छिद्र पडल्यानं रोपांची वाढ खुंटते.

न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका शेरावत सांगतात की जर तुम्ही भाज्या व्यवस्थित धुवून खाल्ल्या नाहीत तर आतड्यांमध्ये ब्लड  सप्लाय व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते आणि मेंदूचे विकार होण्याचा धोका असतो. म्हणूनच भाज्या व्यवस्थित शिजवून खा.

 १ ग्रॅम सोन्यात घ्या स्टोन पेंडंटचे मंगळसुत्र; पाहा रोज वापरण्यासाठी १० सुंदर, आकर्षक डिजाईन्स

पत्ताकोबीतील किटकांना दूर ठेवण्यासाठी ओव्याची फुलं,  पुदीना यांसारखी रोपं लावा.  तीव्र वासानं पत्ता कोबीचे किडे दूर होऊ शकतात. कडुलिंबाचे तेल प्राकृतिक किटकनाशकाप्रमाणे काम करते. पत्ताकोबीतील किटकांना दूर ठेवणं सोपं आहे. मिरची आणि लसणाचा उपयोग करून तुम्ही स्प्रे बनवू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य