आजकाल प्रत्येकाच्याच गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात. वाढत्या वयात लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. काहीजणांना चालताना त्रास होतो तर काहीजणांना शिड्या चढताना वेदना जाणवतात. गुडघ्यांच्या वेदना जेव्हा असह्य्य होतात तेव्हा तुम्ही १ घरगुती उपाय करू शकता. गुडघेदुखीची समस्या टाळण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहायला हवेत. ज्यामुळे तुम्हाला तात्पुरता का होईना आराम मिळेल. (Cabbage Leaves For Knee Pain Relief)
पत्ता कोबी ठरेल फायदेशीर
गुडघ्यांच्या वेदनांमुळे तुम्हाला चालण्यासाठी किंवा फिरण्यासाठी समस्या येत असतील तर हा उपाय करू शकता. पत्ता कोबी जुन्या काळापासून सूज, वेदना आणि सांध्यांच्या समस्येसाठी घरगुती उपाय म्हणून वापरली जात आहे. पत्ता कोबीमुळे गुडघ्यांच्या वेदना कमी होतात तसंच ऑस्टिओआर्थरायटिस आणि सांध्यांच्या वेदनाही कमी होतात. यातील एंटी इंफ्लेमेटरी कम्पाऊंड्स सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पत्ता कोबी कसं काम करते?
पत्ता कोबीमध्ये सल्फर कम्पाऊंड्स व्हिटामीन सी, के आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे सूज कमी करतात आणि वेदनांपासून आराम देतात. २०२२ च्या एका रिसर्चमध्ये दिसून आलं की गुडघ्यांच्या वेदना सूज आणि फंक्शन्समध्ये तितकाच आराम देतात जितका कूलिंग जेल पॅडमुळे मिळतो. जेल किंवा तात्पुरत्या उपायापेक्षा हे फायदेशीर मानले गेले आहे.
हा एक सहाय्यक उपाय आहे. गंभीर स्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ताज्या पत्ता कोबीची मोठी पानं घ्या आणि व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. व्यवस्थित दाबून रस काढून घ्या. ही पानं १५ ते ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. थंड पट्टी सूज कमी करण्यासाठी जास्त परिणामकारक ठरते. गुडघ्यांवर ही पानं सरळ ठेवा आणि सूज असलेली जागा झाकून ठेवा. २ ते ३ वेळा पानं लावून घट्ट बांधा.
किती दिवस वापरावे?
कोबीचे पान प्लास्टीक रॅप किंवा स्वच्छ कापडानं झाकून ठेवा. पट्टी व्यवस्थित बांधा जेणेकरून नीट टिकून राहील. ३० मिनिटं ते १ तास तसंच ठेवा. तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. याच्या नियमित वापरानं तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील.
Web Summary : Suffering from knee pain? Cabbage leaves can help reduce swelling and pain due to their anti-inflammatory properties. Apply fresh cabbage leaves to the affected area for 30 minutes to an hour, or even overnight, for relief. For persistent pain, consult a doctor.
Web Summary : घुटनों के दर्द से परेशान हैं? पत्ता गोभी सूजन और दर्द को कम करने में मदद कर सकती है क्योंकि इसमें एंटी-इंफ्लेमेटरी गुण होते हैं। राहत के लिए ताजी पत्ता गोभी को प्रभावित जगह पर 30 मिनट से एक घंटे या रात भर के लिए लगाएं। लगातार दर्द के लिए, डॉक्टर से सलाह लें।