'झोप' हा आपल्या डेली रुटीनमधील अविभाज्य भाग आहे. आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप मिळणे देखील अधिक जास्त गरजेचे असते. खरंतर, एकूणच झोपेचा आपल्या (Breathing Techniques for Sleep) आरोग्यावर चांगला - वाईट परिणाम दिसून येतो. फिट राहण्यासाठी चांगली झोप (Breathing exercises for better sleep) घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने (How To Breathe Better At Night When Sleeping) करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो(5 Minute Breathing Exercises for DEEP SLEEP).
सध्याच्या काळात झोप न येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते आणि काहीवेळा त्यामुळे चिंता वाढते. कमी झोपेमुळे डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, तणाव, चिंता, एकाग्रतेचा अभाव ते रक्तदाबाच्या समस्यांपर्यंतच्या अनेक समस्या वाढतात. जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकांना रात्री झोप न लागणे ही समस्या आता कॉमन झाली आहे. जर आपल्या झोपेची पद्धत किंवा वेळ चुकीची असेल तर त्याचा हळुहळु आपल्या आरोग्यावर (Breathing Exercises to Relax or Fall Asleep Fast) अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. यासाठीच, रात्री चांगली झोप येण्यासाठी नेमका काय खास उपाय करायचा ते पाहूयात.
रात्री चांगली झोप येण्यासाठी नेमकं काय करावं ?
आपल्यापैकी बरेचजण असे आहेत ज्यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही. अशावेळी झोप लागण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. अंथरुणात पडूनही झोप येत नाही, मनात सतत काही ना काही विचार येत राहतात, झोप लागत नाही म्हणून तळमळ होते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं समजत नाही. यासाठीच, रात्रीच्या वेळी शांत आणि अंथरुणात पडल्या पडल्या झोप यावी यासाठी आपण एक खास उपाय नक्की करून पाहू शकतो. infocusmarathi या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रात्री चांगली झोप येण्यासाठी खास उपाय सांगितला आहे.
infocusmarathi या इंस्टाग्राम अकाऊंटवरून, झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी ५ मिनिटांची एक साधीसोपी अशी ब्रिथिंग टेक्निक शेअर करण्यात आली आहे. रात्रीची शांत, गाढ आणि चांगली झोप येण्यासाठी, सगळ्यात आधी अंथरुणात किंवा बेडवर शांत झोपा. डोळे बंद करा. आता नाकाने खोल आणि हळूहळू श्वास घ्या. आपली पोट आणि छाती पूर्णपणे भरेपर्यंत मोठा श्वास घ्या. याचबरोबर, श्वास घेताना मनातल्या मनात १,२,३,४ असे आकडे मोजा. त्यानंतर श्वास थोड्या वेळासाठी रोखून धरा. अगदी थोडा वेळ. त्यानंतर तोंडाने किंवा नाकाने, ज्या पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, त्याने श्वास घेतलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लावून हळूहळू सोडा. याचाच अर्थ श्वास सोडताना १,२,३,४,५,६ किंवा त्याहून जास्त आकडे मोजा. ही क्रिया करत असताना श्वासावर लक्ष पूर्णपणे केंद्रित करा. असे फक्त ५ मिनिटे करा.
लहान मुलांचं हिमोग्लोबिन कमी, खूप थकतात-चिडचिड करतात? ६ पदार्थ खाऊ घाला, वाढेल रक्त...
गरोदरपणात कियारा अडवाणीच्या चेहऱ्यावर तेज, आरोग्यासाठी ‘या’ सवयी गरोदरपणातही लाख मोलाच्या...
यामुळे नेमकं होत काय ?
ही जी हळूहळू श्वास घेऊन पुन्हा सोडण्याची प्रक्रिया आहे ज्याला Deep Breathing म्हणतात. ती आपल्या nervous system ला शांत करण्यास मदत करते. या उपायामुळे स्ट्रेस कमी होतो, मनातले विचार शांत होतात, हार्ट रेट कमी होतो. याचबरोबर आपल्या शरीराला संदेश मिळतो की, आता रिलॅक्स होण्याची आणि झोपण्याची वेळ झाली आहे. या उपायामुळे तुम्हाला रात्रीची शांत व गाढ झोप लागण्यासाठी मदत होते, सोबतच झोपेत सुधारणा होते. जर आपल्याला देखील रात्रीच्या झोपेची समस्या सतावत असेल तर हा उपाय नक्की करून पाहाच.