सध्या प्रत्येकाच्याच मागचा कामाचा ताण खूप वाढला आहे. आहाराकडे पुरेसं लक्ष नाही, व्यायाम करणं होत नाही. त्यामुळे मग कमी वयातच अनेक आजार मागे लागत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बीपी किंवा रक्तदाब. अगदी तिशीमध्येच असणाऱ्या कित्येक तरुणांना रक्तदाबाच्या गोळ्या सुरु झालेल्या दिसत आहेत. अशावेळी जर आपलं एकदम बीपी वाढलं किंवा आपल्यासमोर जर कोणाला बीपीचा अचानक त्रास सुरू झाला तर त्याला डाॅक्टरकडे नेण्यापुर्वी किंवा डॉक्टरकडे नेत असताना गाडीमध्ये काय प्रथमोपचार द्यायला हवे, याची माहिती प्रत्येकालाच असणं गरजेचं आहे.
अचानक बीपी वाढून छातीमध्ये धडधडत असेल तर काय करावं?
अचानक बीपी वाढलं तर डॉक्टरकडे जाईपर्यंत काय उपाय करायला हवे, याची माहिती योगतज्ज्ञांनी yogicsoul_ranj या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली असून यामध्ये त्यांनी ३ उपाय सुचविले आहेत.
१. सगळ्यात आधी जर एखाद्या शांत जागी स्वस्थपणे बसा आणि त्यानंतर उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा आणि फक्त डाव्या नाकपुडीनेच श्वाय घ्या. असं साधारण २ ते ५ मिनिटे करा. यामुळे शरीरातली चंद्रनाडी जागृत होते. त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊन मन शांत होतं आणि बीपी नियंत्रित होण्यास मदत होते.
२. उजव्या हाताची चंद्रनाडी मुद्रा करा. यासाठी मधले बोट आणि तर्जनी खाली वाकवून घ्या आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. यानंतर डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा एकमेकांना जोडा आणि तो हात गुडघ्यावर ठेवा. आता डाव्या नाकपुडीने दिर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद करून काही सेकंद श्वास रोखून ठेवा. त्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. ही क्रियाही २ ते ४ मिनिटे करावी.
देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा थोडीशी पावडर आणि तेल, १ मिनिटांत चकाचक होतील!
३. आपल्या हातावर हृदय बिंदू असतो. मधले बोट जेव्हा तुम्ही खाली झुकवाल तेव्हा त्याचे टोक तळहातावर अंगठ्याच्या खाली जिथे येईल तो आहे तुमचा हृदय बिंदू. या बिंदुला एखादा मिनिट गोलाकार मसाज करा. दोन्ही हातांवर ही क्रिया करा. बीपी नियंत्रित राहण्यास मदत होईल.