Infection Warning Signs: आजकाल चुकीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषणामुळे इन्फेक्शनची समस्या कॉमन झाली आहे. आपल्या शरीराचा इम्यून सिस्टम जेव्हा एखाद्या इन्फेक्शनशी लढत असतो, तेव्हा सुरुवातीची लक्षणं फार सामान्य असतात. अनेक वेळा या लक्षणांकडे ताण, कमी झोप किंवा सामान्य थकवा समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण याकडे दुर्लक्ष केलं तर समस्या अधिक गंभीर होण्याचा धोका असतो. अशात शरीरात इन्फेक्शन झालं हे कसं ओळखावं हे आज आपण समजून घेणार आहोत.
दुर्लक्ष करू नयेत अशी लक्षणे
कारण नसताना थकवा येणे
जर पुरेशी झोप घेऊनही आपल्याला कमजोरी, थकवा किंवा सुस्ती जाणवत असेल, तर हे शरीरात एखादे इन्फेक्शन चालू असल्याचे संकेत असू शकतात. शरीराला रोजच्या कामांसाठी लागणारी एनर्जी इन्फेक्शनशी लढण्यासाठी खर्च होत असते.
हलका किंवा सतत येणारा ताप
सतत हलका ताप येणे, ताप वारंवार येणे-जाणे, अचानक थंडी वाजणे किंवा रात्री जास्त घाम येणे ही सर्व चिन्हे शरीरातील लपलेल्या इन्फेक्शनकडे इशारा करू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
कारण नसताना अंगदुखी
फार मेहनतीचं काम किंवा एक्सरसाइज न करताही शरीरात दुखणे, अंग दुखणे किंवा आखडलेपणा जाणवत असल्यास ते शरीरातील इन्फेक्शनमुळे होणाऱ्या सूजेचे लक्षण असू शकते.
पोट बिघडणे
पचनाकडे दुर्लक्ष करू नका. इन्फेक्शनचा प्रभाव डाइजेस्टिव सिस्टमवर पटकन दिसतो. अचानक पोटात मुरडा येणे, भूक न लागणे लूज मोशन हे सगळे संकेत सांगतात की शरीर एखाद्या इन्फेक्शनशी लढत आहे.