Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2026 13:40 IST

Soaking feet in hot water with 3 things detox body with remove brain fog less stress better sleep : कडू काढ्यांचा किंवा बेचव डिटॉक्स वॉटर पिण्याचा कंटाळा आला, तर 'बॉडी डिटॉक्स'चा हा साधासोपा उपाय एकदम बेस्ट...

महिन्यांतून किमान एकदा तरी आपल्या संपूर्ण शरीराचे आतून शुद्धीकरण करणे गरजेचे असते. शुद्धीकरण म्हणजेच थोडक्यात 'बॉडी डिटॉक्स' करणे ही सध्याची महत्वपूर्ण गरज आहे. आजकाल बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अनेकजण कडू काढे, महागडी डिटॉक्स ड्रिंक्स किंवा बेचव डिटॉक्स वॉटर पिण्याचा पर्याय निवडतात. मात्र, शरीर स्वच्छ आणि हलकं ठेवण्यासाठी नेहमीच असे कठीण उपाय करण्याची गरज नसते. आयुर्वेद आणि पारंपरिक घरगुती उपायांमध्ये एक अतिशय सोपी आणि आरामदायी पद्धत सांगितली जाते - रात्री झोपण्यापूर्वी एका विशिष्ट प्रकारच्या पाण्यात काहीवेळ पाय बुडवून ठेवणे. हा उपाय केवळ थकवा कमी करत नाही, तर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि शांत झोप लागण्यासही मदत होते(body detox foot soak).

आपल्या पायांच्या तळव्यांना 'दुसरं हृदय' म्हटलं जातं, कारण तिथे हजारो मज्जातंतू आणि महत्त्वाचे ऊर्जा केंद्र असतात. विशिष्ट घटकांनी युक्त असलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्याने त्वचेची छिद्रे उघडतात आणि ऑस्मोसिसच्या प्रक्रियेद्वारे शरीरातील अशुद्धी खेचून घेतली जाते. हे केवळ डिटॉक्सिफिकेशन नाही, तर एक प्रकारचं 'होम स्पा' आहे, जे तुमच्या शरीरासोबतच मनालाही ताजेतवाने करते. कडू काढ्यांचा किंवा सतत ते बेचव डिटॉक्स वॉटर पिण्याचा  कंटाळा आला असेल, तर 'फूट डिटॉक्स'चा हा (Soaking feet in hot water with 3 things detox body with remove brain fog less stress better sleep) साधासोपा उपाय एकदम बेस्ट आहे. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात... 

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नेमकं काय करावं ? 

रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात भिजवल्याने शरीर रिलॅक्स होते. पाण्याच्या उष्णतेमुळे लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारते आणि त्वचेचे छिद्र उघडतात. पण जर या ३ गोष्टी कोमट पाण्यात मिसळून पाय भिजवले, तर शरीर अधिक रिलॅक्स होण्यास आणि आतून डिटॉक्स होण्यास मदत होते.

१. एप्सम सॉल्ट :- कोमट पाण्यात अर्धा कप एप्सम सॉल्ट टाकून त्यामध्ये पाय २० मिनिटे ते अर्धा तास भिजवा. एप्सम सॉल्टमध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरातील शरीरातील साचलेली घाण बाहेर काढते आणि स्नायूंचा ताण कमी करते. यासोबतच, सूज (इन्फ्लेमेशन) कमी करते. तसेच पायांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि काही मिनिटांतच हलके वाटते.

पोटाची ढेरी-जाडजूड मांड्या- फुग्यासारखे गाल लवकर होतील गायब, फक्त ३ सोप्या गोष्टी रोज करा...

२. ॲपल सायडर व्हिनेगर :- त्याच कोमट पाण्यात एक कप ॲपल सायडर व्हिनेगर घालून पाय भिजवल्यास पायांच्या त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो. शरीरातील ऊतींमध्ये अडकलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होते आणि बॉडी डिटॉक्स प्रक्रियेला सुमारे ४०% पर्यंत गती मिळते.

चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्याने छळते अपचन- अ‍ॅसिडिटी- गॅसेस, ९०% महिलांना माहितीच नसते  काय होते चूक... 

३. रोझमेरी, लॅव्हेंडर किंवा आलं :- तिसरा उपाय म्हणजे पाण्यात लॅव्हेंडर, रोझमेरीची पाने किंवा ताजं कापलेलं आलं टाकणे. हे घटक रक्ताभिसरण  वाढवण्यास मदत करतात आणि शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास फायदेशीर ठरतात. 

पाय भिजवल्यानंतर करा हे काम...

दररोज पाय साधारण अर्धा तास या ३ प्रकारच्या पाण्यात भिजवल्यानंतर ड्राय ब्रशिंग करा. ड्राय ब्रश पायांवर खालपासून वर, हृदयाच्या दिशेने फिरवा. असे केल्याने शरीरात साचलेले लिम्फ, प्रदूषक घटक आणि टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

या पद्धतीने बॉडी डिटॉक्स करण्याचे फायदे... 

१. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवणे ही केवळ विश्रांती नसून शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्याची एक उत्तम पद्धत आहे.

२. आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये सुमारे ७ हजार मज्जासंस्था आणि शरीरातील सर्वात मोठी छिद्रे असतात, जी विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

३. यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि 'ब्र्रेन फॉग'ची समस्या दूर होते.

४. तणाव कमी झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

५. विशेषतः या ३ प्रकारच्या पाण्यामध्ये पाय भिजवून ठेवल्याने मन रिलॅक्स होते. तसेच मन अधिक शांत आणि एकाग्र होते. मेंदूवर ताण येत नाही, स्ट्रेस कमी जाणवतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. पायांना पाण्यांत भिजवल्याने शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy, Free Foot Soak Detox: No Bitter Drinks, Diet Needed!

Web Summary : Detoxify your body easily with nightly foot soaks. Adding Epsom salt, apple cider vinegar, or herbs like rosemary helps draw out toxins, improve circulation, and promote relaxation for better sleep. Simple, free, and effective!
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स