आजकाल चालता-फिरता किंवा काम करताना प्रत्येक व्यक्तीच्या कानात तुम्हाला ब्लूटूथ इयरफोन पाहायला मिळतात. ब्लूटूथ वायरलेस इयरफोन आजच्या काळातील एक अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र याच्या वापरामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात निर्माण होतो. हे खरं आहे की ब्लूटूथ उपकरणांमधून रेडिएशन बाहेर पडतं, परंतु याचा अर्थ असा नाही की वायरलेस इयरफोनमुळे लगेच धोका निर्माण होतो.
२०१५ मध्ये शास्त्रज्ञांच्या एका गटाने एका याचिकेवर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये 'नॉन-आयनाइजिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड' (EMF) टेक्नॉलॉजीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आरोग्य जोखमींबद्दल, जसं की कॅन्सर, अशी गंभीर चिंता व्यक्त केली होती. ब्लूटूथ उपकरण याच EMF टेक्नॉलॉजीवर काम करतात. मात्र, 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट'ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, आतापर्यंत असा कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही जो वायरलेस उपकरणांच्या वापराचा थेट कॅन्सर किंवा इतर आजारांशी संबंध जोडतो. ही संस्था मोबाईल थेट वापरण्यापेक्षा ब्लूटूथ वापरणं अधिक सुरक्षित मानत आहे. अशा परिस्थितीत ब्लूटूथ टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका नेमका किती आहे हे जाणून घेऊया.
कॅन्सरचा धोका किती?
ब्लूटूथ ही अशी टेक्नॉलॉजी आहे जे दोन उपकरणांमध्ये कमी अंतरावर वायरलेस कनेक्शन तयार करते. यामध्ये 'शॉर्ट-रेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी'चा वापर केला जातो, ज्याद्वारे जवळ असलेली उपकरणे एकमेकांशी जोडली जातात. ब्लूटूथ उपकरणे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनचा वापर करतात, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे एक रूप आहे. हे रेडिएशन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या माध्यमातून लहरींच्या स्वरूपात पसरतं. आरएफ (RF) रेडिएशन नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही स्वरूपात असतं. मोबाईल, एफएम रेडिओ आणि टेलिव्हिजन देखील अशाच प्रकारचे रेडिएशन सोडतात.
तज्ज्ञ काय म्हणतात?
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील बायोइंजिनिअरिंगचे प्रोफेसर एमेरिटस केन फोस्टर यांच्या मते, ब्लूटूथ उपकरणं मोबाईलच्या तुलनेत कमी रेडिएशन उत्सर्जित करतात. जर एखादी व्यक्ती दररोज अनेक तास ब्लूटूथ हेडफोन वापरत असेल, तर एक्स्पोजर वाढू शकतं, परंतु तरीही ते मोबाईल थेट कानाला लावून बोलण्यापेक्षा कमी असतं.
रेडिएशन आणि कॅन्सरचा संबंध काय?
रेडिएशन प्रामुख्याने दोन प्रकारचे असतं: 'नॉन-आयनाइजिंग' आणि 'आयनाइजिंग'. नॉन-आयनाइजिंग रेडिएशनमध्ये इतकी ऊर्जा नसते की ती अणूंमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकेल, तर आयनाइजिंग रेडिएशनमध्ये ती क्षमता असते. नॉन-आयनाइजिंग रेडिएशन (जसं की आरएफ रेडिएशन) कमी ऊर्जेचे असतं आणि सामान्यतः आरोग्यासाठी कमी धोकादायक मानलं जातं. याउलट आयनाइजिंग रेडिएशन (उदा. एक्स-रे किंवा रेडिओएक्टिव्ह कचरा) टीश्यू (Tissues) आणि डीएनएला हानी पोहोचवू शकतं. जर शरीर खराब झालेल्या पेशी दुरुस्त करू शकलं नाही, तर त्यांचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. कॅन्सर निर्माण करणाऱ्या घटकांना 'कार्सिनोजेन' म्हटलं जातं. काही वैद्यकीय उपचार, जसं की रेडिएशन थेरपी, या श्रेणीत येतात. परंतु सद्यस्थितीतील वैज्ञानिक माहितीच्या आधारे, ब्लूटूथ उपकरणांमधून बाहेर पडणाऱ्या नॉन-आयनाइजिंग रेडिएशनचा थेट कॅन्सरशी संबंध जोडणारा कोणताही भक्कम पुरावा उपलब्ध नाही.
Web Summary : Bluetooth earphones emit radiation, but current evidence doesn't link them directly to cancer. Experts say the radiation is less than from holding a phone to your ear. More research is needed to fully understand long-term risks, but current data suggests minimal danger.
Web Summary : ब्लूटूथ ईयरफोन रेडिएशन उत्सर्जित करते हैं, लेकिन वर्तमान प्रमाण कैंसर से सीधा संबंध नहीं दिखाते। विशेषज्ञों का कहना है कि रेडिएशन फोन को कान पर रखने से कम है। दीर्घकालिक जोखिमों को पूरी तरह से समझने के लिए और शोध की आवश्यकता है, लेकिन वर्तमान डेटा न्यूनतम खतरे का सुझाव देता है।