Join us

गॅस, ॲसिडिटीचा त्रास कमी होऊन पोट नेहमी साफ राहील, नाश्त्याला खा ४ पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:05 IST

Bloating Gas & Acidity Solution : . एक कप पाणी गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे घालून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या जिऱ्याच्या पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.

ब्लोटिंग ही एक गंभीर समस्या आहे (Bloating Gas & Acidity Solution) जी सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच उद्भवते. ब्लोटिंग ही अशी स्थिती आहे जिथे तुमचे पोट भरलेले आणि घट्ट वाटते, अनेकदा गॅसमुळे हे खूप त्रास देऊ शकते.  अशा परिस्थितीत आपल्या दिवसाची सुरुवात पौष्टिक आहार आणि सकस आहाराने करणे योग्य आहे. अपचन, गॅस किंवा फुगणे यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे तुम्हाला त्रास होत असल्यास ४ नाश्त्याचे प्रकार आहारात समाविष्ट करायला हवेत. ( National nutrition week must try 5 healthy breakfast recipe for bloating gas and acidity)

जीरं पाणी

एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जिरे पाचन विकार, अतिसार, अपचन, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी कार्य करतात. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने तुमची सूज बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. एक कप पाणी गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे घालून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या जिऱ्याच्या पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.

सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो? रोज ४ पदार्थ खा, गॅस, ॲसिडिटीपासून मिळेल आराम

केळी आणि ओट्स

एक वाटी गरम ओट्स आणि केळी तुमच्या पोटासाठी आरोग्यदायी असू शकतात. केळ्यामध्ये फायबर असते, जे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास सक्षम करते. तसेच, फायबर अन्नाचे पचन योग्य प्रकारे करते आणि आतड्याची हालचाल सुलभ करते. याशिवाय फायबर पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील ओळखले जाते. यासोबतच ओट्स देखील पचण्याजोगे अन्नाच्या श्रेणीत ठेवले जातात.

बाजरीचा चिला

बाजरीत भरपूर फायबर आढळते. जे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. आणि बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील कार्य करते. तसेच शरीरातील पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत होते.

पपईचे सॅलेड

पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात पपेन नावाचे नैसर्गिक पाचक एंझाइम असते, जे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या लक्षणांपासून आराम देते. अशा स्थितीत हे सॅलेड आपण दररोज नाश्ता पर्याय म्हणून वापरू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य