बदलेल्या जीवनशैलीनुसार अनेकजण साखरऐवजी मधाचा आहारात वापर करतात. (Health Tips) भारतीय स्वयंपाकघरात मध सहज मिळते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण रोज सकाळी लिंबू पाण्यात मध मिसळून पितात. मधाचे आरोग्याला भरपूर फायदे होतात. (black pepper and honey benefits) परंतु मधामध्ये एक पदार्थ मिसळून खाल्ल्याने अनेक आजार दूर राहू शकतात. (natural immunity booster)
आपल्या किचनमध्ये पदार्थांना वेगळी चव आणि सुगंध आणण्यासाठी काळी मिरी फायदेशीर असते. (grandma’s health tip with black pepper) स्वयंपाकघरातच नाही तर काळीमिरीचे औषधी गुणधर्म आहेत. ज्याला आयुर्वेदात अधिक महत्त्व आहे. पावसाळ्यात अनेक आजार डोके वर काढतात. (honey and pepper for digestion)अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास आपण काही आजारांपासून दूर राहू शकतो. मध आणि काळी मिरीचे मिक्स करुन सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घेऊया त्याबद्दल...(black pepper in ayurveda uses)
सकाळी रिकाम्या पोटी प्या चमचाभर नारळाचे तेल, ५ आजारांपासून कायम राहाल दूर- राहाल फिट!
1. मध हे नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. काळी मिरीमध्ये पाइपरिन नावाचा पदार्थ असतो जो श्वसनमार्ग उघडतो आणि पावसाळ्यात सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गजन्य आजारापासून आराम देतो. सकाळी मध आणि काळीमिरी पूड एकत्र घेतल्याने घसा खवखवणे, श्लेष्मा आणि खोकल्यापासून आराम मिळतो. यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो. लहान मुलांसाठी हा असरदार उपाय आहे.
2. काळी मिरी ही पोटात एन्झाइम्सचा स्त्राव वाढवून पचनक्रिया जलद करते. मध आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. हे मिश्रण गॅस, अपचन, बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्ताचा त्रास कमी करते. तसेच पोटाला हलके ठेवून भूक नियंत्रणात ठेवते.
वारंवार डोकं दुखते- ॲसिडिटीचा त्रास? 'या' पद्धतीने खा हिरवी वेलची, त्रास होईल कमी-पचन सुधारेल
3. काळी मिरी चयापचय गतिमान करते आणि चरबी जाळण्यास मदत करते. मधात नैसर्गिक साखर असते, जी आपल्या शरीराला ऊर्जा देते. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी हळूहळू कमी होते. यामुळे वजन कमी होते.
4. मध आणि काळी मिरी अँटीऑक्सिंड्टसने समृद्ध असतात. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ज्यामुळे संसर्गजन्य आजार आणि एलर्जी टाळता येतात. यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. मधासह काळीमिरीचे सेवन केल्याने संधिवात, सांधे कडक होणे आणि वेदनांपासून आराम मिळतो. तसेच शरीराला आतून उष्णता मिळते, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
5. सकाळी रिकाम्या पोटी १ चमचा मधात चिमूटभर काळी मिरी मिसळा. पाणी न घेता हळूहळू याचे चाटण खा. नियमितपणे सेवन केल्यास १ ते २ आठवड्यात फरक जाणवेल.