Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

black coffee benefits for uric acid control : how to reduce uric acid naturally : दररोजची ब्लॅक कॉफी करु शकते युरिक अ‍ॅसिड कंट्रोल, पाहा हा खास घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 14:28 IST2026-03-02T14:14:06+5:302026-03-02T14:28:32+5:30

black coffee benefits for uric acid control : how to reduce uric acid naturally : दररोजची ब्लॅक कॉफी करु शकते युरिक अ‍ॅसिड कंट्रोल, पाहा हा खास घरगुती उपाय...

black coffee benefits for uric acid control how to reduce uric acid naturally | उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अ‍ॅसिड...

सध्याची बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे अनेकांना युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढण्याची समस्या सतावते. युरिक अ‍ॅसिड वाढल्यास सांधेदुखी, सूज यांसारख्या त्रासांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहारात योग्य बदल करणं आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आपल्या फिटनेसने तरुणींना लाजवणारी अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते. पण केवळ सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी ती कोणते घरगुती उपाय करते, याकडे तिच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते(natural ways to reduce uric acid level).

अलीकडेच, शरीरातील वाढलेले युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) कमी करण्यासाठी श्वेता तिवारीने 'ब्लॅक कॉफी' पिण्याचा एक सल्ला दिला आहे, जो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्वेताच्या मते, साखर आणि दूध नसलेली ब्लॅक कॉफी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठीही (how to reduce uric acid naturally) मदत करते. योग्य प्रमाणात घेतलेली ब्लॅक कॉफी शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते आणि युरिकअ‍ॅसिडची पातळी संतुलित ठेवण्यातही मदत करु शकते. नेमकं ब्लॅक कॉफी कशी फायदेशीर ठरते आणि ती पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूयात... 

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर... 

श्वेता तिवारी आपल्या फिटनेसबाबत किती काटेकोर आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण तिने नुकताच एक असा खास उपाय सांगितला आहे जो आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकांना असं वाटतं की कॉफी आरोग्यासाठी हानिकारक असते, पण श्वेताच्या मते, बिनसाखरेची ब्लॅक कॉफी युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) नियंत्रित ठेवण्यासाठी एखाद्या औषधासारखं काम करते. रक्तातील प्युरीनचे (Purine) प्रमाण कमी करण्यासाठी आणि सांधेदुखी, सूज यांसारख्या त्रासांचा धोका टाळण्यासाठी ब्लॅक कॉफी आहे फायदेशीर... 

मुलांची अंथरुणात लघवी करण्याची सवय कायमची सुटेल! दुधात मिसळा चिमूटभर १ पदार्थ - अंथरुण ओलं न होता लागेल शांत झोप...  

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीने स्वतः खुलासा केला की, तिला 'हाय यूरिक ऍसिड'चा (High Uric Acid) गंभीर त्रास होता. या समस्येमुळे तिच्या सांध्यांमध्ये इतक्या वेदना होत असत की, साधे उठणे-बसणे देखील तिला कठीण झाले होते. मात्र, या वेदनांसाठी केवळ औषधांवर अवलंबून न राहता, तिने आपल्या आहारात महत्त्वाचा बदल केला आणि 'ब्लॅक कॉफी' चा समावेश केला. या एका बदलामुळे तिला युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत झाली.

ब्लॅक कॉफी युरिक अ‍ॅसिड कसं नियंत्रित करते? (How Black Coffee Controls Uric Acid)

श्वेता तिवारीच्या मते, ब्लॅक कॉफीचा तिच्या आहारात समावेश केल्यामुळे तिला सांधेदुखीपासून खूप मोठा आराम मिळाला. श्वेता सांगते की, कॉफीमध्ये असलेले शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. नियमितपणे योग्य प्रमाणात कॉफी पिण्यामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होते आणि सांधेदुखी, सूज यांसारख्या त्रासांचा धोकाही टळतो. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अ‍ॅसिडसारखी महत्त्वाची संयुगे असतात. हे घटक शरीरात युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला रोखतात. कॉफी शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर फेकण्याची प्रक्रिया सोपी होते. ब्लॅक कॉफी लघवीचे प्रमाण वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे किडनीद्वारे जास्तीचे युरिक अ‍ॅसिड शरीराबाहेर टाकले जाते.

रिसर्च सांगतो, चक्क शिळी चपातीही आहे सुपरफूड! फक्त 'या' पद्धतीनं खा - वजन, डायबिटीस राहील नियंत्रणात... 

युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी नेमकी कशी प्यावी ? 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही कॉफी पिताना त्यात दूध किंवा साखर अजिबात घालू नका. तुम्हाला फक्त कोरी म्हणजेच 'प्लेन ब्लॅक कॉफी' बनवायची आहे. तुम्ही इन्स्टंट कॉफी वापरू शकता किंवा फिल्टर कॉफी, दोन्ही तितकेच फायदेशीर ठरतात. दिवसातून फक्त १ ते २ कप ब्लॅक कॉफी पिणे पुरेसे आहे. कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अतिप्रमाणात प्यायल्यास झोप न येणे किंवा अस्वस्थता जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. आपण ही कॉफी सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या वेळी घेऊ शकता. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारेल आणि युरिक अ‍ॅसिड बाहेर पडण्यास मदत होईल.

Web Title : श्वेता तिवारी ने इस घरेलू उपाय से यूरिक एसिड किया कम: ब्लैक कॉफी!

Web Summary : श्वेता तिवारी ने खुलासा किया कि ब्लैक कॉफी से उन्हें अपने बढ़े हुए यूरिक एसिड को प्रबंधित करने में मदद मिली, जिससे जोड़ों में तेज दर्द होता था। उन्होंने इसके एंटी-इंफ्लेमेटरी गुणों और अतिरिक्त यूरिक एसिड को बाहर निकालने की क्षमता पर जोर दिया। प्रतिदिन 1-2 कप बिना दूध या चीनी के सेवन करें।

Web Title : Shweta Tiwari reduced uric acid with this home remedy: Black coffee!

Web Summary : Shweta Tiwari revealed black coffee helped manage her high uric acid levels, which caused severe joint pain. She emphasized its anti-inflammatory properties and ability to flush out excess uric acid. Limit intake to 1-2 cups daily without milk or sugar.