सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री ही फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही, तर वयाच्या पन्नाशीतही तिने जपलेल्या फिटनेसमुळे खूपच लोकप्रिय आहे. विशेषतः महिलांच्या आरोग्याबाबत ती सोशल मिडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आणि तासंतास एकाच जागी बसून कराव्या लागणाऱ्या कामामुळे कंबरदुखी ही एक फारच कॉमन समस्या झाली आहे. आजकाल सतत बसून काम करणे, चुकीची झोपण्याची पद्धत किंवा व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना कंबरदुखीचा त्रास जाणवतो(Bhagyashree Shares 4 Simple Bed Exercises for Instant Back Pain Relief).
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने स्वतःच्या अनुभवातून कंबरदुखीवर मात करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि परिणामकारक उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे हे ५ घरगुती एक्सरसाइज तुम्ही कुठलाही खास व्यायामाचा साहित्य न वापरता, अगदी अंथरुणावर किंवा बेडवर झोपल्या-झोपल्या सहज करू शकता. नियमितपणे हे सोपे व्यायाम केल्यास कंबर मजबूत होण्यास मदत होते, दुखणे कमी होते आणि शरीरात पुन्हा हलकेपणा जाणवतो. अनेकांना व्यायामासाठी जिममध्ये जाणे किंवा वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. नेमकी हीच अडचण ओळखून, अभिनेत्री भाग्यश्रीने कंबर दुखीपासून सुटका (Back Pain Relief Made Easy: Bhagyashree’s 4 Effective Bed Exercises) मिळवण्यासाठी ४अतिशय सोपे घरगुती व्यायाम सांगितले आहेत.
कंबर दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी भाग्यश्रीने सांगितला सोपा उपाय...
अभिनेत्री भाग्यश्री ही नेहमीच तिच्या फिटनेस आणि आरोग्यदायी जीवनशैलीमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन घरगुती उपाय आणि आरोग्यदायी टिप्स शेअर करत असते. भाग्यश्रीचे असे मत आहे की, शरीर फिट ठेवण्यासाठी नेहमीच खूप कठीण वर्कआउट करण्याची गरज नसते, तर शरीराची योग्य हालचाल आणि योग्य सवयी जास्त महत्त्वाच्या असतात.
यावेळी भाग्यश्रीने कंबर दुखीपासून (Back Pain) आराम मिळवण्यासाठी काही अत्यंत सोपे व्यायाम प्रकार सांगितले आहेत. या व्यायामांचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे अगदी बेडवर झोपल्या झोपल्या देखील करू शकता. ज्या लोकांना जास्त हालचाल करणे किंवा चालणे-फिरणे शक्य होत नाही, अशा व्यक्तींसाठी देखील भाग्यश्रीने सांगितलेले हे उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात.
१. अँकल टिल्ट एक्सरसाइज (Ankle Tilt Exercise) :- भाग्यश्रीने आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी 'अँकल टिल्ट' व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. हा व्यायाम खालच्या कंबरेचे स्नायू मोकळे करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात आधी बेडवर पाठी टेकवून सरळ झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा आणि त्यामध्ये थोडे अंतर ठेवा. आता तुमची दोन्ही पाऊल आतल्या बाजूला आणि नंतर बाहेरच्या बाजूला फिरवा. ही प्रक्रिया सलग काही वेळ करत राहा. हा एक्सरसाइज केल्यामुळे लोअर बॅकच्या स्नायूंवरील ताण कमी होतो. कंबरेचा आखडलेपणा किंवा स्नायूंच दुखणं दूर होऊन स्नायू लवचिक होण्यास मदत मिळते.
२. हील ऑन टो स्विंग (Heel on Toe Swing) :- भाग्यश्रीने सांगितलेला दुसरा सोपा व्यायाम म्हणजे 'हील ऑन टो स्विंग'. पाठ आणि कंबरेच्या स्नायूंना आराम देण्यासाठी हा एक्सरसाइज खूपच फायदेशीर ठरतो. बेडवर पाठ टेकवून सरळ झोपा आणि पाय सरळ करा. आता तुमच्या एका पायाची टाच दुसऱ्या पायाच्या चवड्यावर ठेवा. याच स्थितीत पाय डावीकडे आणि उजवीकडे हलवत राहा. ही प्रक्रिया दोन्ही पायांनी किमान १० - १० वेळा करा. हा एक्सरसाइज केल्यामुळे पायाच्या आणि कंबरेच्या स्नायूंना चांगला आराम मिळतो आणि पाठदुखीची तीव्रता कमी होते.
३. हिप ओपनर एक्सरसाइज (Hip Opener Exercise) :- कंबरेचा खालचा भाग आणि हिप्समधील आखडलेपणा दूर करण्यासाठी भाग्यश्रीने 'हिप ओपनर' व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. बेडवर पाठ टेकवून सरळ झोपा. आता तुमचे दोन्ही गुडघे वरच्या बाजूला दुमडून घ्या (दोन्ही पावले बेडवर टेकलेली असावीत). यानंतर, दोन्ही गुडघे एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे जमिनीच्या/बेडच्या दिशेने झुकवा. ही हालचाल संथ गतीने काही वेळ करत राहा. हा एक्सरसाइज हिप्समधील आखडलेपणा कमी करतो. अनेकदा हिप्सचे स्नायू आखडल्यामुळे कंबर दुखते, अशावेळी हा एक्सरसाइज कंबर दुखीपासून मोठा आराम मिळवून देतो.
४. फिगर फोर स्विंग (Figure For Swing) :- कंबर दुखीवर 'फिगर फोर स्विंग' हा अत्यंत परिणामकारक एक्सरसाइज आहे. भाग्यश्रीच्या मते, हा व्यायाम केल्याने शरीराच्या खालच्या भागाला चांगला ताण मिळतो. बेडवर पाठ टेकवून झोपा आणि एक गुडघा दुमडून घ्या. आता दुसऱ्या पायाचा घोटा दुमडलेल्या गुडघ्यावर अशा प्रकारे ठेवा की तुमच्या पायांचा आकार इंग्रजी '4' (Four) सारखा दिसेल. या स्थितीत राहून पाय हळूहळू डावीकडे आणि उजवीकडे हलवा हालचाल करताना गुडघा बेडला पूर्णपणे स्पर्श करेल असा प्रयत्न करा. हा एक्सरसाइज केल्याने हिप्स आणि लोअर बॅक (कंबरेचा खालचा भाग) चांगले स्ट्रेच होतात, ज्यामुळे तिथला ताण आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
