Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिमोग्लोबिन वाढावं म्हणून लोहयुक्त पदार्थांसोबत खा ५ गोष्टी - रक्ताची कमतरता होईल दूर - हिमोग्लोबिन वाढेल भरभर...

हिमोग्लोबिन वाढावं म्हणून लोहयुक्त पदार्थांसोबत खा ५ गोष्टी - रक्ताची कमतरता होईल दूर - हिमोग्लोबिन वाढेल भरभर...

best iron rich food combinations for women with anemia : 5 food combinations doctors suggest to increase hemoglobin : लोहयुक्त पदार्थांसोबत 'हे' खाल्ल्याशिवाय मिळत नाही पुरेसं आयर्न, म्हणून पाहा ५ खास फूड कॉम्बिनेशन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 17:38 IST2026-04-09T17:12:44+5:302026-04-09T17:38:23+5:30

best iron rich food combinations for women with anemia : 5 food combinations doctors suggest to increase hemoglobin : लोहयुक्त पदार्थांसोबत 'हे' खाल्ल्याशिवाय मिळत नाही पुरेसं आयर्न, म्हणून पाहा ५ खास फूड कॉम्बिनेशन्स...

best iron rich food combinations for women with anemia best food combinations for iron absorption | हिमोग्लोबिन वाढावं म्हणून लोहयुक्त पदार्थांसोबत खा ५ गोष्टी - रक्ताची कमतरता होईल दूर - हिमोग्लोबिन वाढेल भरभर...

हिमोग्लोबिन वाढावं म्हणून लोहयुक्त पदार्थांसोबत खा ५ गोष्टी - रक्ताची कमतरता होईल दूर - हिमोग्लोबिन वाढेल भरभर...

सध्याची बिझी लाईफस्टाईल आणि बदलत्या आहारपद्धतीमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता ही फारच कॉमन समस्या झाली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (NFHS) ताज्या अहवालानुसार, भारतातील निम्म्याहून अधिक महिलांना ॲनिमियाची समस्या आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सकस - संतुलित आहार घेणाऱ्या महिलांमध्येही ही कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण काय खातो यापेक्षा, आपले शरीर ते किती प्रमाणात शोषून घेते (Iron Absorption) हे जास्त महत्त्वाचे असते. केवळ लोहयुक्त पदार्थ खाऊन चालत नाही, तर त्यासोबत योग्य पदार्थांचे 'कॉम्बिनेशन' असणे देखील गरजेचे असते(best iron rich food combinations for women with anemia).

अशक्तपणा जाणवणे, लवकर थकवा येणे किंवा सतत गळून गेल्यासारखे वाटणे ही लक्षणे रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्याची असू शकतात. अनेकदा आपण पालेभाज्या, फळे आणि सप्लिमेंट्स घेतो, पण तरीही रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन वाढत नसल्याचे दिसते. मग नक्की चुकतंय कुठे? याचा विचार केला असता - ' आयर्न ॲब्जॉर्प्शन'. लोहयुक्त पदार्थांसोबत आपण काय खातो, यावर ते शरीराला किती लागू पडेल हे ठरते. रक्ताची ही कमतरता (5 food combinations doctors suggest to increase hemoglobin) दूर करण्यासाठी डॉक्टर तृप्ती रहेजा यांनी काही फायदेशीर 'फूड कॉम्बिनेशन्स' सांगितले आहेत, ज्यामुळे शरीरातील (best food combinations for iron absorption) रक्ताची कमतरता नैसर्गिकरीत्या दूर होईल.

शरीरातील हिमोग्लोबिन वाढत नसेल तर खावेत असे ५ 'फूड कॉम्बिनेशन्स'... 

१. पालक आणि लिंबू :- पालक हा लोहाचा (Iron) एक उत्तम समृद्ध स्रोत आहे. परंतु पालकमध्ये असलेले लोह शरीराला पूर्णपणे मिळत नाही. त्याचे शोषण (Absorption) वाढवण्यासाठी पालकाच्या भाजीमध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिसळून खावा. यामुळे लोह वेगाने शोषले जाईल.

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

२. बीट, गाजर आणि मोसंबीचा ज्यूस :- गाजर आणि बीटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते आणि त्यातील लोह शरीरात वेगाने शोषले जाण्यासाठी मोसंबीचा ज्यूस मदत करेल. मोसंबीमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' लोह शरीरात पोहोचवण्यास मदत करते. त्यामुळे गाजर आणि बीटसोबत मोसंबीचा ज्यूस नक्की प्या.

३. गूळ आणि चणे :- हा सर्वात जुना पारंपरिक आणि देसी उपाय शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतो. गुळामध्ये लोह असते आणि चण्यामध्ये असलेले प्रोटीन, लोहाचे हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मदत करते.

समंथा प्रभू सांगते २१ दिवसांत वजन कमी करण्याचं  सिक्रेट, पोट होते कमी आणि दिसता एकदम फिट...

४. डाळिंब आणि भोपळ्याच्या बिया :- ऐकायला थोड विचित्र वाटेल, पण जर तुम्हांला डाळिंबातील लोह शरीरात पूर्णपणे शोषून घ्यायचे असेल, तर एक बाऊल डाळिंबाच्या दाण्यांमध्ये एक चमचा भोपळ्याच्या बिया घालून खा. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे भोपळ्याच्या बियांसोबत मिळून हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये मदत करतात.

कायम खुश राहणाऱ्या लोकांच्या ७ सवयी! नेहमी आनंदी राहण्यासाठी असं वेगळं काय करतात - पाहा सोपं गणित... 

५. खजूर आणि बदाम :- दोन खजूर आणि ५ बदाम एकत्र करून खावेत. खजूर आणि बदाम मिळून लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

'या' गोष्टीची काळजी घ्या... 

बहुतेक महिला चहा आणि कॉफी जास्त पितात, परंतु जेव्हा तुम्ही लोहयुक्त पदार्थ खाता, तेव्हा त्याच्या एक तास आधी आणि नंतर चहा किंवा कॉफी अजिबात पिऊ नका. चहा - कॉफी शरीरातील लोह शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात.


Web Title : हीमोग्लोबिन बढ़ाएँ: लौह युक्त खाद्य पदार्थों के साथ ये 5 चीजें खाएं

Web Summary : कई महिलाओं में हीमोग्लोबिन की कमी होती है। लौह युक्त खाद्य पदार्थों को कुछ खास चीजों के साथ मिलाकर आयरन के अवशोषण को बढ़ाएं। पालक के साथ नींबू, चुकंदर-गाजर-संतरे का रस, गुड़ के साथ चना, अनार के साथ कद्दू के बीज या खजूर के साथ बादाम आजमाएं। आयरन युक्त भोजन खाने से एक घंटे पहले/बाद चाय/कॉफी से बचें।

Web Title : Boost Hemoglobin: Eat These 5 Foods With Iron-Rich Foods

Web Summary : Many women face hemoglobin deficiency. Enhance iron absorption by combining iron-rich foods with specific items. Try spinach with lemon, beetroot-carrot-orange juice, jaggery with chickpeas, pomegranate with pumpkin seeds, or dates with almonds. Avoid tea/coffee one hour before/after eating iron-rich meals.