Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

How To Get Rid Of Toothache And Yellow Colour Teeth: तोंडाचे विकार, दाताचे विकार, हिरड्यांचं दुखणं हे सगळं कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा.(natural remedies for tooth cleaning)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2025 16:30 IST2025-07-25T16:29:15+5:302025-07-25T16:30:40+5:30

How To Get Rid Of Toothache And Yellow Colour Teeth: तोंडाचे विकार, दाताचे विकार, हिरड्यांचं दुखणं हे सगळं कमी करायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा.(natural remedies for tooth cleaning)

best home hacks for white teeth, how to get rid of toothache and yellow colour teeth, natural remedies for tooth cleaning  | चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

चिमूटभर हळद घेऊन 'या' पद्धतीने ब्रश करा- दातांना किड लागणार नाही, मजबूत, पांढरेशुभ्र होतील

Highlightsदात आणि तोंडाचे कोणतेही विकार होऊ नयेत यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो?

आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्टचा शोध मागील काही दशकांमध्ये लागला आहे. त्यापूर्वी कडुलिंबाची काडी किंवा त्यासारख्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करूनच दात स्वच्छ केले जायचे. पण नंतर मात्र टूथपेस्टचा शोध लागला आणि हे घरगुती नैसर्गिक उपाय आपण विसरून गेलो. महागड्या टूथपेस्ट आणूनही दातांच्या कित्येक समस्या कमी होतीलच असे नाही (natural remedies for tooth cleaning). म्हणूनच तज्ज्ञांनी असा काही उपाय सुचवला आहे जो आपण घरच्याघरी करू शकतो आणि त्यामुळे दातांचं दुखणं, हिरड्यांचं दुखणं, दाताला कीड लागणे, दात पिवळे होणे, असे अनेक त्रास कमी होऊ शकतात.(best home hacks for white teeth)

 

दात आणि तोंडाचे विकार होऊ नये म्हणून घरगुती उपाय 

दात आणि तोंडाचे कोणतेही विकार होऊ नयेत यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो याविषयीची माहिती तज्ज्ञांनी globallifesaniya या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत की हा एक अगदी जुना पारंपारिक उपाय असून यामुळे दातांचा पिवळेपणाही कमी होतो. दात अगदी स्वच्छ, चकाचक होतात.

दाट, लांब केसांसाठी मृणाल ठाकूर करते 'हा' उपाय- म्हणते माझ्या केसांना एक्सटेंशनची गरजच नाही..

हा उपाय करण्यासाठी तुमच्या तळहातावर २ चिमूट हळद घ्या. त्यामध्ये १ चिमूटभर मीठ घाला आणि मोहरीच्या तेलाचे ५ ते ६ थेंब घाला. त्यावर १ ते २ थेंब लिंबाचा रस घाला. आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि ते तुमच्या टूथब्रशला लावून त्याने दात घासा.

 

दात अतिशय स्वच्छ निघतात. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी होते. काही दिवस हा घरगुती उपाय करून पाहिला तर महागड्या टूथपेस्ट ऐवजी तुम्हाला हाच उपाय आवडू लागेल.

श्रावण शुक्रवारी गूळ फुटाण्यांचा नैवैद्य दाखवा आणि आठवणीने खा! महिलांसाठी ५ महत्वाचे फायदे..

अगदी रोज जरी हा उपाय करणं शक्य झालं नाही तरी आठवड्यातून ३ ते ४ वेळा या पद्धतीने ब्रश करा. लहान मुलांनाही तशी सवय लावा जेणेकरून त्यांचं दातही किडणार नाहीत. मजबूत राहतील. 


 


 

Web Title: best home hacks for white teeth, how to get rid of toothache and yellow colour teeth, natural remedies for tooth cleaning 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.