Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबरं, योगा एक्सपर्टनं सांगितला बेस्ट उपाय...

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबरं, योगा एक्सपर्टनं सांगितला बेस्ट उपाय...

How to get rid of Snoring : योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय आणि एक व्यायाम सांगितला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 20:32 IST2025-05-19T20:31:01+5:302025-05-19T20:32:46+5:30

How to get rid of Snoring : योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय आणि एक व्यायाम सांगितला आहे.

Best easy yoga to get rid of snoring, you should know it | घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबरं, योगा एक्सपर्टनं सांगितला बेस्ट उपाय...

घोरण्याच्या आवाजानं कधीच होणार नाही रात्रीच्या झोपेचं खोबरं, योगा एक्सपर्टनं सांगितला बेस्ट उपाय...

How to get rid of Snoring : रात्री जर आपल्याजवळ कुणी झोपलेलं असेल आणि जोरजोरात घोरत असेल तर नक्कीत आपल्या झोपेचं खोबरं होतं. मग तो पती असो, आई, असो बाबा असो वा अजून कुणी. घोरण्याच्या आवाजानं झोपमोड होणं हे नक्कीच आहे. जे लोक घोरतात त्यांना याचा काही थांगपत्ता नसतो की, त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला झोपलेल्या लोकांचं काय होतं. ते निवांत जोरजोरात आवाज करत झोपलेले असतात. पंचाइत बाकीच्यांची होते. अशात योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय आणि एक व्यायाम सांगितला आहे.

घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे व्यायाम करत असतात. पण यात सगळ्यात महत्वाची बाब ठरते नियमितता. जर हे व्यायाम किंवा योगासने नियमितपणे केली गेली नाहीत तर यांचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. प्रणाली कदम यांनी सांगितलेले हे उपाय खूप सोपे आणि सहज करता येणारे आहेत.

प्रणाली कदम यांनी व्हिडीओ पोस्ट करून घोरण्याची समस्या कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत आणि एक योगासन करून दाखवलं आहे. 

1) झोपण्याआधी वाफ घ्यावी. याने नाक, छाती मोकळी होईल आणि रात्री घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

2) दुसरा उपाय म्हणजे झोपताना दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक एक थेंब गायीचं तूप टाकणे. पण हे करत असताना या गोष्टीची काळजी घ्या की, ज्यांना कफ आणि सर्दी आहे त्यांनी हा उपाय करू नये.

3) तसेच झोपण्याआधी थोडं कोमट पाणी प्यावे. यानेही तुमचं घोरणं कमी करण्यास मदत मिळेल.

4) घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सिंहासन करू शकता. सिंहासन तुम्ही रोज केलं तर तुम्हाचा चांगलाच फायदा जाणवेल.

Web Title: Best easy yoga to get rid of snoring, you should know it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.