Foods For Brain Health: शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक तत्व हवी असतात. जेणेकरून तो आपलं काम योग्यपणे करू शकेल. जर मेंदुला आवश्यक ते पोषक तत्व मिळाले तर मेंदू अॅक्टिवही राहील आणि स्मरणशक्ती देखील मजबूत होईल. अशात काही फूड्सचा आहारात समावेश करायला हवा. या फूड्सच्या मदतीनं स्मरणशक्ती वाढते, लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते आणि वाढत्या वयातही मेंदू चांगलं काम करतो. चला तर पाहुयात कोणते फूड्स मेंदुसाठी फायदेशीर असतात.
ब्लूबेरी
हे फळ दिसायला जरी लहान असलं तरी खूप गुणकारी आहे. ब्लूबेरीमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट असतात, जे मेंदुचा कोणत्याही प्रकारच्या डॅमेजपासून बचाव करतात. तसेच यानं स्मरणशक्तीही खूप वाढते. आठवडाभर काही ब्लूबेरी खाल्ल्यास मेंदू हेल्दी राहण्यास मदत मिळते.
संत्री
मेंदुसाठी फायदेशीर फूड्सच्या यादीत संत्री हे फळ सुद्धा येतं. यातील व्हिटामिन सी मुळे मेंदुचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. स्मरणशक्ती वाडते आणि फोकसही वाढतो.
हळद
हळदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण भरपूर असतात. तसेच यात भरपूर अॅंटी-ऑक्सीडेंट्सही असतात. त्यातील एक म्हणजे करक्यूमिन आहे. यानं सूज कमी होते, मूड चांगला राहतो आणि स्मरणशक्ती वाढते.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात मॅग्नेशिअम, झिंक आणि आयर्न भरपूर असतं. या गोष्टी मेंदुच्या कामकाजासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच यांनी स्मरणशक्तीही वाढते.
डार्क चॉकलेट
चॉकलेट खाणं सगळ्यांनाच आवडतं. पण इतर कोणत्याही चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यात फ्लेवोनॉइड्स आणि कॅफीन असतं. ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि स्ट्रेस कमी होतो.