>आरोग्य > दुखणीखुपणी > Benefits of Pani Puri : नीरज चोप्राला उगाचच नाही आवडत पाणीपुरी; तज्ज्ञांनी सांगितले ६ जबरदस्त फायदे!

Benefits of Pani Puri : नीरज चोप्राला उगाचच नाही आवडत पाणीपुरी; तज्ज्ञांनी सांगितले ६ जबरदस्त फायदे!

Benefits of Pani Puri : नीरज चोप्राने पाणीपुरीचे कौतुक करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी पुरीने तुमचे पोट भरते. पुरी खूप हलकी आहे आणि पिठापासून बनवली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:13 PM2021-09-19T15:13:47+5:302021-09-19T15:48:06+5:30

Benefits of Pani Puri : नीरज चोप्राने पाणीपुरीचे कौतुक करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी पुरीने तुमचे पोट भरते. पुरी खूप हलकी आहे आणि पिठापासून बनवली जाते.

Benefits of Pani Puri : Amazing health benefits of eating pani puri or golgappa as per expert | Benefits of Pani Puri : नीरज चोप्राला उगाचच नाही आवडत पाणीपुरी; तज्ज्ञांनी सांगितले ६ जबरदस्त फायदे!

Benefits of Pani Puri : नीरज चोप्राला उगाचच नाही आवडत पाणीपुरी; तज्ज्ञांनी सांगितले ६ जबरदस्त फायदे!

Next
Highlightsरक्तातील साखरेची वाढलेली पातळी ही जगभरात एक सामान्य समस्या बनली आहे. असे बरेच लोक आहेत जे मधुमेहामुळे ग्रस्त आहेत, ज्यांच्यासाठी कोणताही उपचार नाहीत. हा नाश्ता केवळ चवीला भन्नाट नाही. तर तो आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे देणारा आहे. कारण हे आपल्याला शक्य तितक्या सोप्या मार्गाने आवश्यक पोषक तत्त्व प्रदान करते. 

संध्याकाळच्या नाश्त्याचा पदार्थ किंवा काहीतरी चटपटीत स्नॅक्स म्हणून सगळ्यांनाच पाणीपुरी आवडते. देशात पाणीपुरीला विविध राज्यात विविध नावांनी ओळखलं जातं. पुचका, गुपचूप, पानी के बताशे, गोलगप्पा अशी अनेक नावं आहेत.  हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. वर्षानुवर्षे त्याची लोकप्रियता अधिक वाढली आहे.  परदेशी लोकांनाही हा अद्भुत पदार्थ आवडतो. वेगवेगळ्या भारतीय राज्यांमध्ये पाणीपुरी वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते.

काही दिवसांपूर्वी भाला फेकण्याच्या ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रानं पाणीपुरीचे उत्तम खाद्य म्हणून वर्णन केले आणि म्हणाला, एकदा पाणीपुरी खाल्ल्यानं कोणत्याही खेळाडूच्या शरीराचं नुकसान होत नाही. आता तुम्हाला समजले असेल की पाणीपुरी कधीतरी खाणं वजन कमी करण्याच्या मार्गात अडथळा आणत नाही.

नीरज चोप्राने पाणीपुरीचे कौतुक करण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाणी पुरीने तुमचे पोट भरते. पुरी खूप हलकी आहे आणि पिठापासून बनवली जाते. पाणीपुरी मध्ये सुद्धा खूप कमी मसाला आहे, त्यामुळे ते खाण्यात काही नुकसान नाही.

पाणीपुरी खाण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात? 

१) नोएडा येथील कोलकाता होमिओपॅथी सेंटर (बीएचएमएस) च्या डॉक्टर मीनाक्षी शर्मा यांनी सांगितले की, पाणीपुरी खाणं  आरोग्यासाठी चांगले आहे. त्यात वापरले जाणारे पदार्थ पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक घटकांमुळे समृद्ध आहेत, जे तोंडात आढळणारे अनावश्यक जीवाणू नष्ट करण्यात मदत करतात. डॉक्टर असेही म्हणतात की पाणीपुरी पचनासाठी चांगली आहे.

२) हा नाश्ता केवळ चवीला भन्नाट नाही. तर तो आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे देणारा आहे. कारण हे आपल्याला शक्य तितक्या सोप्या मार्गाने आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते. 

३) हा घटक तुमच्या रक्ताला ऑक्सिजनयुक्त ठेवण्यास मदत करतो. ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासह, पाणीपूरीमधून मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट, जस्त आणि जीवनसत्त्वे ए, बी -6, बी -12, सी आणि डी मिळतात.

४) डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर 

रक्तातील साखरेची वाढलेली पातळी ही जगभरात एक सामान्य समस्या बनली आहे. असे बरेच लोक आहेत जे मधुमेहामुळे ग्रस्त आहेत, ज्यांच्यासाठी कोणताही उपचार नाहीत. म्हणून, आपण गोड पदार्थ आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ देखील टाळावेत. पाणीपुरी हे कमी कॅलरी असलेले जेवण आहे ज्यात गोड चटणी हा एक पर्याय आहे. मधुमेहाचा रुग्ण कोणत्याही चिंता न करता या नाश्त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो. तथापि, आपण किती प्रमाणात खात आहात याची जाणीव ठेवणे ही मुख्य गोष्ट आहे!

५) एसिडिटीची समस्या कमी होते

जेवण वेळेवर न करणे, जास्त खाणे, मध्यरात्री स्नॅक्स खाणे, जाड होणे, ही एसिडिटी होण्याची सामान्य कारणे आहेत. पाणीपुरी आपल्याला या परिस्थितीत मदत करू शकते, कारण जलजीराच्या पाण्यात इतर अनेक घटक असू शकतात जे एसिडीटीवर कार्य करू शकतात आणि त्रासापासून बरं वाटण्यास मदत करतात. यात पुदीना, कच्चा आंबा, काळे मीठ, काळी मिरी, किसलेले जिरे आणि सामान्य मीठ यांचा समावेश आहे.

६) मूड चांगला राहतो

उन्हाळा असो की हिवाळा, मसालेदार पाणीपुरीसह शेवची थाळी नेहमी तुमचा मूड चांगला बनवण्यास मदत करू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीपुरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. कारण त्या काळात तुम्हाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. पाणीपुरीच्या  पाण्याने तुम्हाला थोडे उत्साही आणि ताजेतवाने वाटते.

Web Title: Benefits of Pani Puri : Amazing health benefits of eating pani puri or golgappa as per expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी! - Marathi News | Food, Recipe: How to make aamla candy at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवळे ना उकडायचे, ना शिजवायचे; गॅस न वापरता करा खुटखुटीत आंबट गोड आवळा कॅण्डी!

Aamla candy recipe without using gas: आवळा कॅण्डी बनविण्याची सोपी रेसिपी... गॅस न वापरताच तयार करा बाजारात मिळते तशी खुटखुटीत, रसरशीत आंबट- गोड आवळा कॅण्डी. ...

Healthy Desi Ghee Benefits : कोण म्हणतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं? चांगल्या तब्येतीसाठी पांढरं तूप खायचं की पिवळं, वाचा फायदे - Marathi News | Healthy Desi Ghee Benefits : Yellow vs white which variety of desi ghee is healthier and why | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढरं की पिवळं? चांगल्या तब्येतीसाठी कोणतं तूप खायचं? वाचा गुणकारी फायदे

Healthy Desi Ghee Benefits : काहीजणांना वाटतं तूप खाल्ल्यानं वजन वाढतं. म्हणून ते तूप खाणं टाळतात. गावठी तूप देखील दोन प्रकारचं आहे. एक पिवळं तूप आणि दुसरे पांढरं तूप. पांढरं तूप म्हशीच्या दुधापासून तर पिवळे तूप गाईच्या दुधापासून बनवले जाते. ...

सुर्र के पीओ, सुपर टेस्टी मिक्स व्हेज सूप! भाज्यांना नाक मुरडणारेही म्हणतील, दिल मांगे.. - Marathi News | Food, Recipe: How to make mix veg soup, yummy and tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुर्र के पीओ, सुपर टेस्टी मिक्स व्हेज सूप! भाज्यांना नाक मुरडणारेही म्हणतील, दिल मांगे..

Healthy treat: कधी कधी भाज्या खाण्याचा कंटाळा येतो ना? अशा वेळी करा मिक्स व्हेज सूप (mix veg soup).... थंडीमध्ये स्वत:ला आणि घरातल्या सगळ्यांना द्या मस्त गरमागरम हेल्दी ट्रीट... सुर्र के पीओ... ...

weight loss Tips : वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण सोडलं? हेल्दी स्लिम व्हा, 4 चुका टाळा... - Marathi News | Weight Loss Tips: Did you skip dinner to lose weight? Be Healthy Slim, Avoid 4 Mistakes ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :weight loss Tips : वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण सोडलं? हेल्दी स्लिम व्हा, 4 चुका टाळा...

वजन कमी करायचं असेल तर आहाराबाबत काही गोष्टी आवर्जून माहित असायला हव्यात.. ...

Housework lead to sharper memory : रोज घरकाम केल्यानं स्मरणशक्ती राहते तल्लख; रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Housework lead to sharper memory : Doing daily housework keeps the memory brilliant; Revealed from research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज घरकाम केल्यानं स्मरणशक्ती राहते तल्लख; रिसर्चमधून खुलासा

Housework lead to sharper memory : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, घरकाम करणार्‍या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली राहते. ...

Food Combinations: अरे आवरा यांना! पिझ्झा पुरणपोळी, न्यूडल्स समोसा, भलतेच अतरंगी खाद्यप्रयोग; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Food Combinations worst food : Viral Food Combinations worst food disaster ever and twitterati agree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे आवरा यांना! पिझ्झा पुरणपोळी, न्यूडल्स समोसा, भलतेच अतरंगी खाद्यप्रयोग; पाहा व्हायरल व्हिडीओ

Food Combinations worst food : फॅन्टा मॅगी, न्यूडल्स समोसा,  टोमॅटो चाट असे प्रकार पाहून नक्की या लोकांना काय करायचंय, असा प्रश्न पडतो. ...