रोजच्या जेवणात हळदीचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्यापासून अनेक आजारांवर मात करण्यासाठी हळद बहुगुणी आहे. हळद ही फक्त पदार्थांची चव वाढवणारा घटक नसून ते एक नैसर्गिक औषध आहे. जेव्हा या हळदीचा दुधासोबत मिलाफ होतो, तेव्हा तयार होणाऱ्या पेयाला 'गोल्डन मिल्क' (Golden Milk) म्हणून ओळखले जाते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत, रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी हळदीचे दूध एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. (Benefits of Turmeric milk )
हळदीमध्ये करक्युमिन नावाचा घटक असतो, ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे घटक शरीराला आतून शुद्ध करतात. अनेकांना प्रश्न पडतो की, हळदीचे दूध नेमके कधी प्यावं, सकाळी की रात्री? सकाळी प्यायल्याने दिवसभर ऊर्जा मिळते की रात्री प्यायल्याने शांत झोप लागते? आयुर्वेदानुसार, हळदीचे दूध पिण्याचे काही नियम आहेत.(Best time to drink turmeric milk Morning or Night) जर हे दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी घेतले, तर त्याचे फायदे शरीराला दुप्पट मिळतात. हे आपल्या रक्तातील विषारी घटक बाहेर टाकत नाही, तर हाडांना मजबुती देते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करते.(Haldiche dudh kadhi pyave) बदलत्या हवामानात होणारे संसर्ग, सर्दी-खोकला किंवा स्नायूंचे दुखणे यावर हळदीचे दूध हा सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर घरगुती उपाय आहे. हळदीच्या दूध पिण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे पाहूया.
Apple Cider Vinegar आणि पाणी! नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं फिटनेस सिक्रेट, पाहा तिचा डाएट प्लान
1. दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. पण जेव्हा त्यात चिमूटभर हळद मिसळली जाते, तेव्हा हाडांची घनता वाढण्यास मदत होते. ज्यांना सांधेदुखी किंवा ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे दूध अत्यंत गुणकारी आहे. हे हाडांची झीज रोखून त्यांना मजबूत बनवते.
2. हळदीच्या दुधामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्त शुद्ध होते. रक्तातील अशुद्धी दूर झाल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे, डाग कमी कमी होतात आणि त्वचा तजेलदार दिसू लागते. नियमित सेवनाने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
3. वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांसाठी हळदीचे दूध सर्वोत्तम आहे. हे शरीरातील संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढवते. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात होणारे व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी हे कवच म्हणून काम करते.
4. जर आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर हळदीचे दूध पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हळदीमध्ये असणारे घटक मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे गाढ झोप लागते.
5. हळदीमध्ये पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते. ज्यांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास आहे. त्यांनी कोमट दुधात चिमूटभर हळद घालून प्यायल्याने आराम मिळतो.
6. शरीराला जखम झाली असेल किंवा अंग दुखत असेल तर हळदीचे दूध औषधासारखे काम करते. हे अँटी-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून काढते आणि सूज कमी करते.
7. हळदीमधील करक्युमिन हे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते. जर आपण साखर न घालता हे दूध प्यायलात, तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार हळदीचे दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
1. आयुर्वेदानुसार हळदीचे दूध पिण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ३० मिनिटे ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. रात्री हे दूध घेतल्याने शरीराची डिटॉक्स प्रक्रिया वेगाने होते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. तसेच शांत झोपेसाठीही हीच योग्य वेळ आहे.
2. आपल्याला शारीरिक थकवा जास्त जाणवत असेल, तर आपण सकाळीही हे दूध घेऊ शकता. पण रिकाम्या पोटी केवळ दूध पिण्याऐवजी नाश्त्यानंतर घेणे फायदेशीर आहे.
3. ज्यांना पित्ताचा त्रास, किडनी स्टोन किंवा ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी हळदीचे मर्यादित प्रमाणात वापरावी.
