Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फॅटी लिव्हर-वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं तर आहारात हवी मूगडाळ, तब्येतीसाठी जणू अमृतच

फॅटी लिव्हर-वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं तर आहारात हवी मूगडाळ, तब्येतीसाठी जणू अमृतच

Moong Dal Water Benefits : जर वेळीच खाण्या-पिण्यात बदल केला नाही तर तब्येतीचं तंत्र बिघडतंच.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:28 IST2025-07-09T14:14:09+5:302025-07-09T15:28:59+5:30

Moong Dal Water Benefits : जर वेळीच खाण्या-पिण्यात बदल केला नाही तर तब्येतीचं तंत्र बिघडतंच.

Benefits of moong dal water for fatty liver and cholesterol | फॅटी लिव्हर-वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं तर आहारात हवी मूगडाळ, तब्येतीसाठी जणू अमृतच

फॅटी लिव्हर-वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करायचं तर आहारात हवी मूगडाळ, तब्येतीसाठी जणू अमृतच

Moong Dal Water Benefits : बदलती लाइफस्टाईल, अचकल-बचकल खाण्याच्या सवयी आणि कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी न करणं यामुळे आजकाल लोकांना वेगवेगळ्या आजारांचा विळखा बसत आहे. बरेच तर असे आजार असतात ज्यांबाबत आपल्याला आधी माहितही नसतं किंवा असं काही होईल यांचा विचारही केलेला नसतो. असाच एक आजार म्हणजे फॅटी लिव्हर. अनेकांना हेच वाटतं की, फॅटी लिव्हरची समस्या केवळ अल्कोहोलमुळे होते. पण असं काही नाहीये. लिव्हरवर फॅट जमा होण्याची दोन वेगवेगळे आजार आहेत. एक म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. म्हणजे जे दारू पित नाहीत, त्यांना सुद्धा ही समस्या होऊ शकते. जर वेळीच खाण्या-पिण्यात बदल केला नाही तर लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर फेल अशा स्थितींचा सामना करावा लागू शकतो. 

पण अनेकांना हे माहीत नसतं की, औषधांसोबतच काही घरगुती उपायांनी सुद्धा ही समस्या दूर करता येऊ शकते. फक्त यासाठी आपल्याला आहारात काही बदल करण्याची गरज असते. आयुर्वेद एक्सपर्टनुसार, मूगाच्या डाळीचं पाणी फॅटी लिव्हरसाठी एक नॅचरल उपाय आहे. यानं लिव्हरवरील चरबी कमी तर होतेच, सोबतच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात. इतकंच नाही तर नसांमध्ये जमा कोलेस्टेरॉलही कमी होतं.

लिव्हर आणि आतड्यांचे एक्सपर्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी सांगितलं की, आजकाल बदललेलं खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलमुळे पचन, लिव्हर आणि हृदयासंबंधी समस्या होतात. अशात पिवळ्या मूड डाळीचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. पिवळ्या मूग डाळीच्या पाण्यानं शरीरात जमा झालेलं फॅट डिटॉक्स होतं, पचन सुधारतं आणि धमण्याही साफ होतात.

फॅटी लिव्हर

फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी मूगाच्या डाळीचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. मूग डाळीतील अमिनो अ‍ॅसिड आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स लिव्हरच्या पेशी रिपेअर करतात. तसेच या पाण्यानं लिव्हरमध्ये जमा जास्तीचं फॅटी वितळून बाहेर निघतं.

वजन कमी होतं

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नेहमीच मूगाच्या डाळीचं पाणी प्यायला हवं. कारण मूग डाळीत कॅलरी कमी असतात आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात जास्त खाणं टाळलं जातं.

कोलेस्टेरॉल कमी होतं

मूग डाळीचं पाणी हृदयासाठीही फायदेशीर ठरतं. कारण यानं नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. यानं रक्तवाहिन्या साफ होतात, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. अशात नियमितपणे मूग डाळीचं पाणी प्याल तर हृदय निरोगी राहील.

पचन चांगलं होतं

मूगाची डाळ इतर डाळींपेक्षा पचनासाठी खूप हलकी असते. त्यामुळे पचनासंबंधी समस्याही दूर होतात. या पाण्यानं पोटातील उष्णता कमी होते, गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन अशा समस्याही दूर होतात. याचा फायदा फॅटी लिव्हरमध्ये मिळतो.

डेंग्यूपासून बचाव

डेंग्यू डास चावल्याने होणारा एक गंभीर आजार आहे. अलिकडे तर या आजाराने सगळीकडेच थैमान घातलं आहे. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.

मूग डाळीचं पाणी कमी करण्याची पद्धत

मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. मूग डाळीचं हेल्दी पाणी पिण्यासाठी तयार आहे. 

Web Title: Benefits of moong dal water for fatty liver and cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.