Pillow Sunlight Benefits: घरातील सगळ्यात महत्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे उशी. आपण जेव्हाही झोपतो किंवा आराम करतो तेव्हा उशीची गरज पडते. उशीशिवाय अनेकांना झोपही येत नाही. पण उशी वरवर स्वच्छ दिसली तरी मुळात ती घरातील सर्वात जास्त बॅक्टेरिया असणारी वस्तू असू शकते. अशात उशी रोज उन्हात ठेवाल तर अनेक फायदे मिळतील.
रोज झोपताना तुमची उशी घाम, तेल, मृत त्वचा, बॅक्टेरिया आणि धुळीचे कण शोषून घेते. त्यामुळे उशीच्या आत हजारो बॅक्टेरिया आणि डस्ट माइट्स वाढू लागतात. यामुळे पिंपल्स, खाज, सकाळी उठताच शिंका येणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक लोक उशी स्वच्छ ठेवण्यासाठी ती उन्हात ठेवतात. पण प्रश्न असा उशीला उन्हात ठेवणे योग्य आहे का? विज्ञान काय सांगतं?
उशीला उन्हात ठेवू शकतो का?
हो फक्त ठेवूच नाही, तर आठवड्यातून एकदा तरी उशी उन्हात ठेवायलाच हवी. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणं नैसर्गिक डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतात. Journal of Photochemistry and Photobiology मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सूर्याच्या UV किरणांनी उशी, चादर आणि गाद्यांमधील 90% बॅक्टेरिया व डस्ट माइट्स नष्ट होतात. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे.
लोक उशी उन्हात का ठेवतात?
- बॅक्टेरिया आणि कीटाणूंना नष्ट करण्यासाठी उशी उन्हात ठेवली जाते. UV किरणे बॅक्टेरिया, फंगस आणि माइट्सचे DNA तोडतात, त्यामुळे ते जिवंत राहत नाहीत.
- ओलावा आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी सुद्धा उशी उन्हात ठेवली पाहिजे. उन्हामुळे उशीमध्ये साठलेला ओलावा बाहेर पडतो आणि उशी पुन्हा फ्रेश होते.
- झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा हा उपाय फायदेशीर ठरतो. स्वच्छ उशीवर झोपल्याने अॅलर्जी कमी होते, पिंपल्स कमी होतात, खाज दूर होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
उशीला उन्हात ठेवल्यावर काय होते?
आठवड्यातून एकदा 2–3 तास उशी थेट उन्हात ठेवल्यास उशीतील 90% बॅक्टेरिया आणि माइट्स मरतात. UV किरणं फंगस, मोल्ड आणि इतर मायक्रोब्सचे DNA मोडतात. नाक बंद होणे, सकाळी डोकेदुखी यांसारख्या तक्रारी कमी होऊ लागतात. उशी नैसर्गिकपणे फूलते, मुलायम आणि कोरडी होते. ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि उशी नव्यासारखी ताजी वाटते. फक्त एका दिवशी उन्हात ठेवल्यावरही त्वचेवर सकारात्मक बदल दिसू लागतात.
