Join us

चाळिशी ओलांडलेल्या महिलांसाठी लसूण वरदानच! लसूण पाकळी चावून खा - हार्ट, हाडे व हार्मोन्स ठेवा तंदुरुस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2025 16:34 IST

benefits of eating raw garlic on empty stomach for women over 40 : why women over 40 should eat garlic daily : चाळिशीनंतर महिलांनी रोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने महिलांच्या शरीरात काय बदल होतात पाहा...

वयाची चाळिशी हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. चाळिशी उलटल्यानंतर महिल्यांच्या शरीरात हळूहळू अनेक बदल होऊ लागतात. हार्मोनल बदल, हाडांची ताकद कमी होणे, थकवा, वजन वाढ, आणि त्वचेत होणारे बदल असे अनेक फरक दिसू लागतात. बदललेल्या लाईफस्टाईलमुळे या आरोग्य समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे चाळिशी उलटल्यानंतर महिलांनी शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत, शरीराला आतून बळकटी देणारे नैसर्गिक उपाय खूप उपयोगी ठरतात, त्यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे रोज सकाळी एक लसूण पाकळी चावून खाणे. स्वयंपाकघरातील एक छोटीशी कच्च्या लसणाची पाकळी महिलांना वयाच्या चाळिशीनंतर फिट राहण्यास मदत करते( why women over 40 should eat garlic daily).

लसूण फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर 'अँटीऑक्सिडंट्स' आणि 'अँटी-इंफ्लेमेटरी' गुणधर्मांनी परिपूर्ण असा नैसर्गिक औषधी पदार्थ आहे. विशेषतः चाळिशीनंतर महिलांनी रोज सकाळी उपाशी पोटी फक्त एक लसूण पाकळी चावून खाल्ल्यास, अनेक गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून हाडांचे आरोग्य जपण्यापर्यंत रोज एक लसूण पाकळी चावून खाण्याचे मोठे फायदे आहेत, ज्यामुळे तुम्ही चाळिशीनंतरही एकदम तंदुरुस्त आणि निरोगी राहाल... चाळिशी नंतर महिलांनी रोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने महिलांच्या शरीरात काय बदल होतात, याबद्दल आपण आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ नंदिनी (benefits of eating raw garlic on empty stomach for women over 40) यांनी दिलेली माहिती पाहूयात...  

 चाळिशीनंतर महिलांनी रोज सकाळी उपाशी पोटी लसणाची पाकळी का चावून खावी?

१. चाळिशीनंतर महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम महिलांच्या हृदय आरोग्यावर देखील होतो. या वयात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकारांचा धोका असतो. अशावेळी रोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने हृदयाला त्याचा फायदा होतो आणि हार्ट ॲटॅकचा धोका कमी होतो.

२. लसणामध्ये असलेले ॲलिसिन रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्तप्रवाह सुधारते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तसेच रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते. लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने हार्ट ॲटॅकचा आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

कोणत्या कुशीवर झोपल्याने लागते चटकन झोप? शांत व गाढ झोप येण्यासाठी करा ५ गोष्टी...

३. या वयात महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे थकवा, मूड स्विंग्ज आणि हॉट फ्लॅशेस अशा समस्या जाणवू शकतात. लसणामध्ये असलेले फायटोएस्ट्रोजेन शरीरात नैसर्गिकरित्या इस्ट्रोजेनची कमतरता भरून काढते. यामुळे मूड स्विंग्ज कमी होतात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.

४. चाळिशीनंतर, महिलांना अनेकदा पचनाशी संबंधित समस्या सतावतात. अशावेळी, लसणामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांना स्वच्छ ठेवतात आणि पचनक्रिया सुधारतात.

केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं नस्त दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध... 

५. रोज लसूण पाकळी खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते आणि त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते.

६. लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे पोट हलके होते आणि शरीर अधिक अ‍ॅक्टिव्ह  राहते

७. चाळिशीनंतर रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, उपाशी पोटी लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने संसर्ग आणि सर्दी खोकल्यासारख्या समस्या दूर होतात.

८. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि सल्फर असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. चाळिशीनंतर रोज १ लसूण पाकळी चावून खाल्ल्यास त्वचा आणि केसांसाठी देखील त्याचा खूप फायदा होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Garlic: A boon for women over 40! Chew daily for health.

Web Summary : For women over 40, a daily garlic clove boosts heart health, balances hormones, aids digestion, and strengthens immunity. Garlic's anti-inflammatory properties reduce joint pain and detoxify the body, promoting overall well-being and healthy skin and hair.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलाफिटनेस टिप्स