आपल्यापैकी बऱ्याचजणांकडे रात्रीच्या जेवणात उरलेली शिळी चपाती फेकून न देता दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते. घरात उरलेली चपाती दुसऱ्या दिवशी खाणं ही अनेक घरांमध्ये अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु काहीजण शिळी चपाती आरोग्यासाठी चांगली मानतात, तर काहींच्या मते ती खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या त्रास देऊ शकतात. "शिळं अन्न आरोग्यासाठी चांगलं नसतं," असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. पण तुम्हांला हे ऐकून (Benefits of eating leftover roti Baasi Roti) आश्चर्य वाटेल की, काही रिसर्चमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, शिळी चपाती खाणे हे आरोग्यासाठी वरदानाप्रमाणेच ठरू शकते...पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चार-पाच दिवसांपूर्वीची चपाती खावी.
शिळी चपाती खाण्याचाही एक ठराविक काळ आणि पद्धत असते. ती किती तास जुनी असावी? मधुमेहापासून (Diabetes) ते पचनाच्या तक्रारींपर्यंत शिळी चपाती कशी गुणकारी ठरते? आणि नेमकी कोणासाठी ती 'अयोग्य' ठरू शकते? या सर्व गोष्टींची देखील तितकीच काळजी घेणं गरजेचे असते. शिळी चपाती (शिळी चपाती खाण्याचे फायदे) खाणं योग्य की अयोग्य ? आणि आरोग्याच्या दृष्टीने शिळ्या चपातीचे फायदे-तोटे आणि ती खाण्याची योग्य पद्धत पाहूयात...
शिळी चपाती खाणं योग्य की अयोग्य ?
आत्तापर्यंत आपण आपल्या आई आणि आजीकडून शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकलेच असतील. रिसर्चनुसार, शिळ्या किंवा थंड चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्सची रचना बदलते, ज्यामुळे ती हळूहळू पचते आणि (Benefits of eating leftover roti) शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार, शिळ्या चपातीमध्ये काही महत्त्वाचे पोषक घटक वाढतात, ज्यामुळे ती आरोग्यासाठी चांगली असते. योग्य प्रकारे स्टोअर करुन ठेवलेल्या शिळ्या चपातीमध्ये 'रेजिस्टंट स्टार्च' तयार होतो. हा स्टार्च पचन सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
अनेक न्यूट्रिशन आर्टिकल्स आणि अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार, शिळ्या चपातीचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' ताज्या चपातीपेक्षा कमी असतो. याचा अर्थ शिळी चपाती शरीरात हळूहळू साखर रिलीज करते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही. जर मर्यादित प्रमाणात शिळी चपाती खाल्ली तर मधुमेह आणि प्री-डायबिटीक असणाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन-प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या रिव्ह्यू पेपर्सनुसार, शिळ्या चपातीमधील रेजिस्टंट स्टार्च हा 'प्रीबायोटिक' म्हणून काम करतो. म्हणजेच तो आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्नासारखा असतो, ज्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
इंटरनॅशनल हेल्थ ब्लॉग आणि लाईफस्टाईलसंबंधित वेबसाईट्सनुसार, शिळ्या चपातीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते आणि तिचे पचन मंद गतीने होते. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, परिणामी 'ओव्हरईटिंग' टाळले जाते आणि पोर्शन कंट्रोलमध्ये मदत होऊन वजन कमी करणे सोपे जाते. थंड किंवा शिळ्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्सची रचना बदलते, ज्यामुळे ती शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवत राहते.
किती दिवसांची शिळी चपाती खाणं फायदेशीर ?
शिळी चपाती खाण्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ती योग्य प्रकारे स्टोअर करुन ठेवलेली असेल. साधारणपणे १० ते १२ तासांच्या आत खाल्ली पाहिजे. जास्त काळ बाहेर उघड्यावर ठेवलेल्या चपातीमध्ये बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकते. यामुळे फूड पॉयझनिंग, पोटदुखी, उलट्या आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. जर चपातीला थोडा जरी वास येत असेल किंवा त्यावर डाग दिसत असतील, तर ती त्वरित फेकून द्यावी.
शिळी चपाती खावी की खाऊ नये ?
रिसर्चमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ताजी चपाती खाणं हा नेहमीच पहिला पर्याय असावा. मात्र, कधीतरी योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवलेली शिळी चपाती खाणे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते. तुम्हाला मधुमेह, गॅस किंवा पोटाच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग शिळी चपाती खावी.
Web Summary : Research suggests stale chapati, stored properly and eaten within 12 hours, can aid digestion, control blood sugar due to resistant starch. It helps manage weight by promoting fullness. Consult a doctor if you have diabetes or digestive issues before consumption.
Web Summary : रिसर्च बताते हैं कि बासी रोटी, ठीक से संग्रहीत और 12 घंटों के भीतर खाने से, पाचन में मदद मिल सकती है और प्रतिरोधी स्टार्च के कारण रक्त शर्करा को नियंत्रित किया जा सकता है। यह तृप्ति को बढ़ावा देकर वजन प्रबंधित करने में मदद करता है। सेवन से पहले मधुमेह या पाचन संबंधी समस्याओं होने पर डॉक्टर से सलाह लें।