आजकाल अनहेल्दी लाईफस्टाईल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत आहे. अशा स्थितीती एरंडेल तेल पोटासाठी एक उत्तम उपाय आहे. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी एरंडेल तेल पोटासाठी गुणकारी ठरत असल्याचं सांगितलं आहे. एरंडेल तेलामुळे पोट साफ राहण्यास मदत होते, एनर्जी वढते. पोट साफ करण्यासाठी एरंडेल तेल कसं वापरायचं समजून घेऊ.(Benefits Of Caster Oil For Stomach And Intestines Sadhguru Shares Easy Home Remedy)
सद्गुरू सांगतात रोज रात्री अर्धा चमचा एरंडेल तेल गरम करा. हे तेल दूध किंवा पाण्यात मिसळून प्या. यामुळे पोट व्यवस्थित साफ राहील आणि लिम्फॅटीक सिस्टीमसुद्धा एक्टिव्ह होईल. कारण एरंडेल तेल शरीरातील सुस्ती कमी करण्यास मदत करते. सद्गुरूंच्यामते पोट साफ होणं आणि तुम्ही एनर्जेटीक राहणं यांचा घनिष्ट संबंध आहे.
एरंडेल तेल कसं तयार होतं?
एरंडेल तेल एक वनस्पती तेल आहे. जे एरंडीच्या शेंगा, रिकिनस कम्युनिस नावाच्या रोपाच्या बियांमधून निघते. या बियांमध्ये 40 ते 60 टक्के तेल असते. यात पिवळे तरल पदार्थ असतात ज्याची चव आणि सुगंध वेगळा असतो. एरंडेल तेल मल बाहेर ढकलण्यास मदत करते. याच्या सेवनानं पचनक्रियाही चांगली राहते. गॅस, ब्लॉटींग अशा समस्या उद्भवत नाही. याशिवाय आतड्यांची साफसफाई होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते.
एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?
सद्गुरू सांगतात की एरंडेल तेल रात्रीच्यावेळे दूध किंवा पाण्यासोबत प्या. याव्यतिरिक्त एरंडेल तेल जेवणासोबतही तुम्ही घेऊ शकता. पण एरंडेल तेल योग्य प्रमाणातच घ्या. जास्त प्रमाणात घेतल्यास नुकसानकारक ठरू शकतं.
