Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चेहऱ्यावर ग्लो हवा, बिघडलेलं पचन नीट करायचंय? नाभीत घाला ‘हे’ तेल २ थेंब, पाहा फायदे..

चेहऱ्यावर ग्लो हवा, बिघडलेलं पचन नीट करायचंय? नाभीत घाला ‘हे’ तेल २ थेंब, पाहा फायदे..

Belly Button Oiling: अनेकांना प्रश्न पडतो की, नाभीमध्ये कोणतं तेल टाकणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:56 IST2025-04-18T10:03:37+5:302025-04-18T16:56:13+5:30

Belly Button Oiling: अनेकांना प्रश्न पडतो की, नाभीमध्ये कोणतं तेल टाकणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Benefits of Applying Castor Oil in Belly Button | चेहऱ्यावर ग्लो हवा, बिघडलेलं पचन नीट करायचंय? नाभीत घाला ‘हे’ तेल २ थेंब, पाहा फायदे..

चेहऱ्यावर ग्लो हवा, बिघडलेलं पचन नीट करायचंय? नाभीत घाला ‘हे’ तेल २ थेंब, पाहा फायदे..

Belly Button Oiling: अलिकडे नाभीमध्ये तेल टाकण्याच्या फायद्यांबाबत तुम्ही सोशल मीडियावर खूप काही वाचत असाल किंवा बघत असाल. तसा तर हा जुना उपाय आहे. पण अलिकडेच त्याची चर्चा जास्ती होताना दिसत आहे.  तसेच आपल्या शरीरातील सगळ्यात अस्वच्छ अवयव नाभीला मानलं जातं. त्यामुळे नाभीची स्वच्छता करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. नाभीमध्ये तेल टाकल्यानं बॉडी डिटॉक्स होते. मात्र, अनेकांना प्रश्न पडतो की, नाभीमध्ये कोणतं तेल टाकणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

नाभीमध्ये तेल टाकण्याचे फायदे

- नाभीमध्ये तेल टाकल्यानं नाभिची स्वच्छता होते. नाभीमध्ये तेल टाकून दुसऱ्या दिवशी धुतल्यास आतील डेड स्किन निघून जाते. सामान्यपणे नाभि पूर्णपणे स्वच्छ करणं अवघड असतं. त्यामुळे यात तेल टाकलं तर काम सोपं होतं.

- नाभीमध्ये तेल टाकल्यानं त्यात फंगस जमा होणे आणि फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका टाळला जातो.
 
- पोट बिघडलं असेल किंवा पोटात दुखत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आरामदायक ठरू शकतो.

- मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही नाभीमध्ये तेल टाकू शकता. 

- तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, नाभीमध्ये तेल टाकल्यानं चेहऱ्याची चमक आणखी वाढते.

- चेहऱ्यावर दिसणारे डाग, सुरकुत्या आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

कसं टाकाल तेल?

नाभीमध्ये टाकण्यासाठी तेल हलकं गरम करा. हे तेल नाभीच्या आजूबाजूला लावा किंवा सरळ झोपून नाभीमध्ये तेलाचे २ ते ३ थेंब टाका. काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी नाभी पाण्यानं धुवून घ्या.

कोणतं तेल टाकाल?

वेदिको डॉट इन नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आयुर्वेदिक टिप्स देणारे व्हिडीओ पोस्ट केले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये त्यांनी नाभीमध्ये कोणतं तेल टाकावं याबाबत माहिती दिली आहे. 

त्वचा ग्लोईंग करण्यासाठी नाभीमध्ये एरंडीचं तेल टाकू शकता. तर पचन तंत्र मजबूत करण्यासाठी नाभीमध्ये तुम्ही तूप टाकू शकता. तसेच जॉइंट्स दुखणं कमी करायचं असेल तर तिळाचं तेल टाकू शकता. 

जर कुणाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ते नाभीमध्ये एरंडीचं तेल टाकून शकता किंवा तूप टाकू शकता. अॅक्ने दूर करण्यासाठी आणि त्वचेच्या फायद्यासाठी नाभीमध्ये खोबऱ्याचं तेल टाकणं फायदेशीर ठरू शकतं. अॅंटी एजिंग गुण मिळवण्यासाठी नाभीमध्ये बदामाचं तेल टाकू शकता.

Web Title: Benefits of Applying Castor Oil in Belly Button

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.