Join us

नको कॉफी-नको चहा, थंडीत करा ओव्याचा चहा, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर सोपी युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:59 IST

Benefits Of Carom Seeds Tea in Winter : शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास ओव्याच्या चहानं मदत मिळेल. कारण ओव्याच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटामिन आढळतात. चला जाणून घेऊ या चहाचे फायदे...

Benefits Of Carom Seeds Tea in Winter : वातावरण बदललं की, आपल्या खाण्या-पिण्यात बदल करणंही खूप महत्वाचं असतं. तसे तर लोक रोज सकाळी झोपेतून उठल्यावर दुधाचा चहा पितात. पण आता थंडी वाढायला सुरूवात झाली आहे. अशात जर दुधाचा चहा सोडून ओव्याचा चहा प्याल तर आपल्याला इतके फायदे मिळतील की, विचारही केला नसेल. आणि जरा सवयीत बदल केला तर नुकसान नाहीच, फायदा होईल. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास ओव्याच्या चहानं मदत मिळेल. कारण ओव्याच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटामिन आढळतात. चला जाणून घेऊ या चहाचे फायदे...

ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

गॅसची समस्या होईल दूर

बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात.

वजन कमी होतं

आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याचा चहा प्यावा. सकाळी रिकम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट वेगाने कमी होतं. ओव्याचा चहा प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

तणाव कमी होतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित प्याल तर शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.

अस्थमामध्ये फायदेशीर

अस्थमासारखा आजार असलेल्या पीडित व्यक्तींनी ओव्याच्या चहा प्यायला हवा. ओवा गरम असतो अशात अस्थमाच्या रूग्णांसाठी हा औषधाचं काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने अस्थमाच्या रूग्णांना मदत मिळते.

मासिक पाळीत फायदेशीर

जर तुम्ही नियमितपणे ओव्याचा चहा घ्याल तर हा आपल्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतं. या चहानं महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

सर्दी-खोकला होईल दूर

आता काही प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ या समस्या कॉमन आहेत. अशात तुमच्यासाठी हिवाळ्यात ओव्याच्या चहाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरत असतं. 

कसा कराल ओव्याचा चहा?

ओव्याचा चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी एका भांड्यात उकडून घ्या. यात अर्धा चमचा ओवा टाका आणि कमी आसेवर उकडू द्या. त्यानंतर हे पाणी नंतर एका कपमध्ये टाका आणि वरून त्यात थोडा लिंबाचा रस व थोडं मध टाका. तुमच्या ओव्याचा चहा तयार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ditch coffee, embrace ajwain tea: winter health secret revealed!

Web Summary : Replace your regular tea with ajwain tea this winter for numerous health benefits! Ajwain tea aids digestion, reduces weight, relieves stress, eases asthma, reduces menstrual pain, and fights cold and cough. Prepare easily with ajwain, water, lemon, and honey.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्सआरोग्य