चपात्या (Stale Chapati) उरल्या तर अनेकदा फेकून दिल्या जातात कारण काहीजणांच्या मते शिळं अन्न खाल्ल्यानं तब्येतीचं मोठं नुकसान होतं. खरं तर प्रत्येकाच्याच घरात एखादी चपाती जास्त उरते तर कधी ५ ते ६ चपात्या उरतात. उरलेल्या चपात्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. उरलेल्या चपात्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ शकता. फेकून देण्यापेक्षा शिळी चपाती खाल्ली तर तब्येतीलाही बरेच फायदे मिळतील. शिळी चपाती खायचे फायदे काय आहेत ते पाहू. (Benefits And Side Effects Of Stale Chapati)
डायबिटीक रुग्णांसाठी फायदेशीर
शिळी चपाती डायबिटीस असलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरते. रात्रभर ठेवल्यामुळे चपातीतील स्टार्च 'रेसिस्टंट स्टार्च मध्ये रूपांतरित होतो. 'अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन' (American Journal of Clinical Nutrition) मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, रेसिस्टंट स्टार्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे सकाळी शिळी चपाती खाल्ल्याने दिवसभर रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते.
पचनशक्ती चांगली राहते
शिळी चपाती सहज पचते आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 'जर्नल ऑफ फंक्शनल फूड्स' मधील एका अभ्यासानुसार, रेसिस्टंट स्टार्च हा एक प्रकारचा प्रीबायोटिक फायबर आहे, जो आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतो (Ref). यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात.
महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीचे १० प्रकार, नावं वेगळी पण थाट तोच-मानही तसाच खास
वजन कमी करण्यास मदत होते
शिळी चपाती खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता. रेसिस्टंट स्टार्चमुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते.
शिळी चपाती खाताना काय काळजी घ्यावी
शिळी चपाती म्हणजे २४ तासांपूर्वी बनवलेली चपाती. जर ती जास्त खराब झाली असेल, तर ती खाऊ नये.
शिळी चपाती रोज किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाला त्रास होऊ शकतो, विशेषतः जर तुम्ही गरम दुधाऐवजी थंड दुधासोबत खात असाल तर. जर चपातीला बुरशी लागली असेल किंवा तिचा वास बदलला असेल तर ती अजिबात खाऊ नये.
पोट थुलथुलीत दिसतं-डाएट जमतच नाही? रोज १ ग्लास ताक 'या' पद्धतीनं प्या-सपाट होईल पोट
शिळी चपाती फक्त थंड दुधासोबत किंवा कोरडी खावी. ती भाजी किंवा अन्य पदार्थांसोबत खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. वारंवार शिळं अन्न खाल्ल्यानं गॅस किंवा पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कधीतरी अशा अन्नाचे सेवन करावे.