Belly Fat Cause Psoriasis : लठ्ठपणा आजकाल एक मोठी समस्या बनला आहे. कारण लठ्ठपणा (Obesity) आपल्यासोबत अनेक गंभीर आजारही घेऊन येतो. लठ्ठपणा वाढल्यावर लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे डायबिटीस, हृदयरोग आणि काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर लठ्ठपणामुळे ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्टेरॉल, स्लीप एप्निया, फॅटी लिव्हर आणि स्ट्रोकचा सुद्धा धोका वाढतो. तसेच आता एका नव्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, लठ्ठपणामुळे तुम्हाला सोरायसिस (Psoriasis) आजार देखील होऊ शकतो.
अलिकडेच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, शरीराच्या मधोमध म्हणजे पोटावर आणि पोटाच्या आजूबाजूला जमा होणाऱ्या चरबीमुळे म्हणजे बेली फॅटमुळे (Belly Fat) सोरायसिस आजाराचा धोका अधिक वाढतो. खासकरून महिलांना या आजाराचा धोका अधिक जास्त असतो. त्यामुळे सोरायसिसमध्ये वजन नियंत्रित ठेवणं खूप महत्वाचं ठरतं.
काय आहे सोरायसिस?
सोरायसिस एक क्रॉनिक इन्फ्लेमेशन असलेली स्किन कंडीशन आहे. ज्यात स्किन सेल्स अधिक वेगानं वाढतात. ज्यामुळे त्वचेवर खाज येणारे पॅच तयार होतात. तसेच त्वचा ड्राय होऊ निघू लागते. उलल्यासारखी होते. हा आजार सामान्य नसून एक ऑटोइम्यून कंडीशन आहे. ज्यात शरीराचं इम्यून सिस्टीम त्वचेच्या कोशिकांना असामान्य रूपानं वाढण्याचं संकेत देतं आणि नंतर शरीराचं इम्यून सिस्टीमच त्वचेच्या कोशिकांवर हल्ला करतं. सोरायसिसनं पीडित अनेक व्यक्तींमध्ये शरीरात फॅटचं प्रमाण खूप वाढलेलं असतं.
बेली फॅट आणि सोरायसिस
ब्रिटनच्या किंग्स कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी सांगितलं की, बेली फॅट आणि सोरायसिस यांच्यात संबंध आढळून आला आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये या आजाराचे जीन्स नसतील तरी सुद्धा फक्त बेली फॅटमुळे व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.
जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव इर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी 3,30,000 पेक्षा अधिक लोकांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात सोरायसिसनं पीडित 9 हजारांपेक्षा अधिक लोक होते.
अभ्यासाकांनी पारंपारिक पद्धती आणि अॅडव्हान्स इमेजिंग टेक्निकच्या माध्यमातून शरीरातील फॅटच्या 25 वेगवेगळ्या मापांची टेस्ट केली होती. यादरम्यान त्यांना आढळलं की, कोणत्या भागातील चरबी सोरायसिसशी संबंधित आहे. त्यानंतर निष्कर्ष समोर आलेत. तसेच महिलांना याचा अधिक धोका असल्याचं सुद्धा समोर आलं.