ॲपल सायडर व्हिनेगर म्हणजे सफरचंदांपासून तयार केलेला एक प्रकारचा व्हिनेगर. गेल्या काही वर्षांत वजन कमी करणे, पचन सुधारण्यासाठी मदत, त्वचेची काळजी आणि केसांसाठी उपयोग अशा अनेक कारणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. (Before using apple cider vinegar, remember 4 things, health tips )अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी ॲपल सायडर व्हिनेगर पितात, तर काही जण तो सँलेड किंवा डिटॉक्स ड्रिंक म्हणून वापरतात. मात्र त्याचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने वापरल्यास शरीराला त्रासही होऊ शकतो. तसेच या पदार्थाचे नाव वापरुन अनेक प्रॉडक्ट्स विकले जातात. पण त्याऐवजी हा पदार्थ थेट वापरता येतो.
ॲपल सायडर व्हिनेगर प्रामुख्याने पचन सुधारण्यासाठी वापरला जातो. काही लोकांना जडपणा, अपचन किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर कमी प्रमाणात तो घेतला जातो. तो भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करु शकतो, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्येही अनेक लोक त्याचा समावेश करतात. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही काही लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करतात. त्यात साखर आणि इतर फॅट्स काहीच नसतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी वापरले जाते.
त्वचेसाठीही ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर केला जातो. चेहऱ्यावर जास्त तेल येणे किंवा काही लोकांना पिंपल्सचा त्रास असेल तर तो पाण्यात मिसळून टोनर सारखा वापरतात. काही जण केसांमध्ये कोंडा कमी करण्यासाठी किंवा डोकं स्वच्छ ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग करतात. मात्र त्वचा आणि केसांवर वापरण्यापूर्वी तो नेहमी डायल्यूट करणे गरजेचे असते. ॲपल सायडर व्हिनेगर वापरण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. तो कधीही थेट पिऊ नये. साधारण एक ग्लास कोमट किंवा साध्या पाण्यात एक ते दोन चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून घेतला जातो. सुरुवातीला कमी प्रमाणात वापरणे चांगले मानले जाते. काही लोक तो सॅलेड वर ओतायच्या चटणीमध्ये किंवा डिटॉक्स ड्रिंकमध्येही वापरतात.
मात्र वापरताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे तो थेट पिणे. ॲपल सायडर व्हिनेगर खूप ऍसिडीक असल्याने तो दातांच्या इनेमलला नुकसान पोहोचवू शकतो आणि घशात जळजळ होऊ शकते. त्यामुळे नेहमी पाण्यात मिसळूनच तो घ्यावा. खूप जास्त प्रमाणात सेवन करणेही टाळावे. जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात जळजळ, अॅसिडीटी किंवा पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्वचेवर किंवा केसांवर वापरताना देखील तो थेट लावू नये. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, लालसरपणा असे त्रास होऊ शकतात. ॲपल सायडर व्हिनेगर हा काही जादुई उपाय नाही, पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास तो काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात वापरण्यापेक्षा संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली अधिक महत्त्वाची असते.
Web Summary : Apple cider vinegar aids digestion, weight management, and skin care when diluted. Never consume directly; mix with water. Overuse causes acidity. Use cautiously for optimal benefits alongside a balanced diet.
Web Summary : सेब का सिरका पाचन, वजन प्रबंधन और त्वचा की देखभाल में मदद करता है, पर इसे पतला करें। कभी सीधा न पिएं; पानी में मिलाएं। अधिक उपयोग से एसिडिटी होती है। संतुलित आहार के साथ सावधानी से उपयोग करें।