Bathing Mistakes : रोज सकाळी झोपेतून जागे झाल्यावर फ्रेश होण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करणं हे सगळ्यांचच रूटीन असतं. कुणी थंड पाण्याने आंघोळ करतं, तर कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात. कुणी एक वेळ आंघोळ करतं, तर कुणी दोन वेळ. आंघोळ करणं आरोग्यासाठी महत्वाचं आहेच. पण जास्तीत जास्त लोक आंघोळ करताना एक मोठी चूक करतात. जी महागात पडू शकते. आपली आंघोळ करण्याची पद्धत ब्लड प्रेशर, हार्ट आणि मेंदूवर प्रभाव पाडू शकते. अनेक लोक आंघोळ करताना एक मोठी चूक करतात ती म्हणजे थेट डोक्यावर पाणी टाकणे. असे केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.
आयुर्वेदानुसार आंघोळ करणे ही एक कला आहे आणि त्याचे काही नियम आहेत. शरीरावर पाणी योग्य क्रमाने टाकले नाही तर अचानक तापमान बदलामुळे शरीरावर ताण येऊ शकतो.
आंघोळीची चुकीची पद्धत
जर तुम्ही आंघोळ करताना थेट डोक्यावर किंवा छातीवर थंड पाणी टाकत असाल, तर यामुळे शरीराला अचानक तापमान बदलाचा धक्का बसू शकतो. वरचा भाग एकदम थंड आणि खालचा भाग गरम राहतो. ब्लड प्रेशर झपाट्यानं बदलतो. बीपी अचानक वाढणे किंवा घटणे सुरू होते. हृदयाच्या रुग्णांसाठी ही पद्धत अत्यंत धोकादायक ठरू शकते. चक्कर येणे, थकवा, अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसू शकतात. खूप थंड किंवा खूप गरम पाणी दोन्ही नुकसानकारक ठरू शकते.
आंघोळ करताना सर्वप्रथम पाणी कोणत्या भागावर टाकावे?
आंघोळ करताना सर्वप्रथम आपल्या पायांवर (पंजांवर) पाणी टाकावे. यामुळे शरीराचे तापमान हळूहळू संतुलित होते. हृदय आणि मेंदूला अचानक धक्का लागत नाही. ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहतं.
यानंतर हा क्रम पाळा
पाय → पंजे, टाचांपासून गुडघे, गुडघ्यांपासून मांड्या, हात हलके ओले करा नंतर खांद्यावर पाणी टाका आणि शेवटी डोक्यावर पाणी टाका असं केल्यानं शरीर हळूहळू थंड तापमानाशी जुळवून घेतं. रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावत नाहीत, त्यामुळे बीपी वाढण्याचा धोका कमी होतो.
आंघोळ करताना या गोष्टींची काळजी घ्या
पाणी नेहमी कोमट असावे
खूप थंड किंवा खूप गरम पाण्याचा वापर टाळा
कोमट पाण्याने बीपी नियंत्रणात राहतो
कमजोरी, चक्कर यांसारखी तक्रार असल्यास जास्त वेळ आंघोळ करू नका
हृदयाचे रुग्ण किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्णांनी आंघोळीची पद्धत डॉक्टरांशी जरूर चर्चा करावी
