Join us

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते तोंडाला दुर्गंधी? वाचा, दुर्गंधी येण्याची महत्वाची कारणं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:57 IST

Mouth Smell : जास्तीत जास्त वेळा तोंडाच्या दुर्गंधीची समस्या तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यानं होते. त्याशिवाय कधी कधी तोंडातून दुर्गंधी येण्याचं कारण व्हिटॅमिनची कमतरताही असू शकतं.

Mouth Smell : तोंडाच्या येणाऱ्या दुर्गंधीमुळे चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अनेकांना दातांची चांगली स्वच्छता करून तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. तोंडाच्या दुर्गंधीमुळे आत्मविश्वासही प्रभावित होतो. जास्तीत जास्त वेळा तोंडाच्या दुर्गंधीची समस्या तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यानं होते. त्याशिवाय कधी कधी तोंडातून दुर्गंधी येण्याचं कारण व्हिटॅमिनची कमतरताही असू शकतं.

व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्यास तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. कारण हे व्हिटॅमिन रक्त निर्माण, तंत्रिका तंत्राचं आरोग्य आणि शरीरातील वेगवेगळ्या क्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. अशात जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता होते, तेव्हा तोंडातून दुर्गंधी येते, सोबतच इतरही काही समस्या होतात.

कोणत्या होतात समस्या?

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असेल तर यानं शरीराची एनर्जी लेव्हल प्रभावित होऊ शकते. ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते. तसेच व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्यास तंत्रिका तंत्रात समस्या होऊ शकते, जसे की, झिणझिण्या किंवा हाय-पाय सुन्न होणे. त्याशिवाय हे व्हिटॅमिन शरीरात कमी झालं तर एनीमियाही होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होते आणि थकवा जाणवतो. व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्यावर मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडू शकतो, जसे की, डिप्रेशन, भ्रम आणि चिंता.

कसं मिळवाल हे व्हिटॅमिन?

व्हिटॅमिन बी १२ तुम्ही दूध, दही आणि पनीरसारख्या डेअरी प्रोडक्ट्समधून मिळवू शकता. बदाम, ओट मिल्क आणि काही धान्यांमधूनही तुम्हाला हे व्हिटॅमिन मिळू शकतं. जर तुम्ही प्लांट बेस्ड डाएट फॉलो करत असाल तर पालक, बीट, मशरूम आणि बटाटे यांमधूनही व्हिटॅमिन बी १२ मिळवू शकता.

तोंडाची दुर्गंधी येण्याची इतर काही कारणं

- तोंडात बॅक्टेरियामुळे दुर्गंधी निर्माण होते. हे बॅक्टेरिया मुख्यपणे जिभेच्या मागे आणि दातांच्या मधे जमा असतात. जिथे दुर्गंधी निर्माण होते. जर दातांची स्वच्छता व्यवस्थित केली नाही तर तोंडाची दुर्गंधी येऊ शकते.

- तोंडात योग्य प्रमाणात लाळ तयार न झाल्यानं तोंड कोरडं पडतं. ज्यामुळे बॅक्टेरियांचा विकास अधिक होतो आणि दुर्गंधी वाढते. हे सामान्यपणे रात्री किंवा जास्त तणावामुळे होतं.

- हिरड्यांमध्ये सूज, दातांमध्ये इन्फेक्शन किंवा कीड यामुळेही तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. दातांना कीड आणि हिरड्यांमध्ये इन्फेक्शन बॅक्टेरियासाठी परफेक्ट वातावरण तयार करतात.

- जेवणात कच्चा लसूण, कांदा आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. त्याशिवाय साखरेचे पदार्थ अधिक खाल्ल्यानंही तोंडात बॅक्टेरिया वाढतात. 

- पाणी कमी पित असाल तरीही तोंडाची दुर्गंधी येते. त्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावं. ज्यामुळे लाळ जास्त प्रमाणात तयार होते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स