Rice Eating Tips : प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रवृत्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे की, त्याच आधारावर आपल्या रोजच्या सवयी असल्या पाहिजे. पण आजच्या काळात शरीराच्या प्रवृत्तीनुसार, आहार घेणं अवघड आहे. हेच कारण आहे की, चुकीच्या खाण्या-पिण्याने शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. अनेकांमध्ये पचनासाठी आवश्यक अग्नि कमी असते, अनेकांना डायबिटीस, थायरॉइडसारख्या समस्या होतात. या समस्या खासकरून वात प्रवृत्तीच्या लोकांमध्ये अधिक असतात.
भात हा भारतीयांच्या आहारातील महत्वाचा भाग असतो. बरेच लोक दोन्ही वेळच्या मुख्य जेवणात भात आवर्जून खातात. पण वात प्रवृत्तीच्या लोकांनी भात खावा की नाही, हे माहीत असणं गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार, वात दोषाचा स्वभाव हलका, थंड आणि कोरडेपणा देणारा असतो. तर भाताचा स्वभाव हा गोड, थंड आणि पचनासाठी सोपा असतो. अशात जर काही नियमांसोबत भात खाल्ला तर त्याने वात शांत करण्यास मदत मिळते.
भात खाण्याचे नियम
वात प्रवृत्ती असलेल्या लोकांनी भात खाण्यासाठी १ वर्ष जुना तांदूळ वापरावा. कारण तांदूळ जितका जुना असेल, तेवढे जास्त गुण त्यात असतात. त्यासोबतच नेहमी गरम आणि ताजा भातच खावा. फ्रिजमध्ये ठेवलेला थंड आणि शिळा भात वात वाढवू शकतो. तसेच पचनासंबंधी समस्या निर्माण करू शकतो. भात नेहमी तुपासोबत खावा. तूप चिकट असतं आणि वाताला शांत करून शरीराचा कोरडेपणाही शांत करण्यास मदत करतं.
रात्री भात खाणं टाळा
भात कधी खावा? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तर भात नेहमी दुपारच्या वेळी खावा. यावेळी पचन अग्नि अधिक सक्रिय असते आणि सगळ्या प्रकारचं अन्न पचवण्यास समर्थ असते. वात प्रवृत्तीच्या लोकांनी रात्री भात खाणं टाळलं पाहिजे. रात्री भात खाल्ल्याने कफ आणि वात दोन्हीही असंतुलित होऊ शकतात.
काय काळजी घ्याल?
वात प्रवृत्तीच्या लोकांनी भातासोबत दही खाणं टाळलं पाहिजे. यामुळे शरीरात वाताचं असंतुलन निर्माण होऊ शकतं. प्रयत्न करा की, भात नेहमी मूग डाळ आणि एक चमचा तुपासोबतच खावा. याने भाताचा आणि शरीराचा शुष्कपणा कमी होतो.
Web Summary : Ayurveda suggests those with Vata should favor aged rice, eaten warm with ghee, during the day. Avoid rice at night to prevent imbalances. Combining rice with mung dal and ghee is beneficial. Steer clear of curd with rice.
Web Summary : आयुर्वेद के अनुसार वात प्रकृति वालों को पुराना चावल, घी के साथ दिन में खाना चाहिए। रात में चावल से बचें। चावल को मूंग दाल और घी के साथ खाना फायदेमंद है। दही के साथ चावल खाने से बचें।