Join us

उपाशीपोटी हळदीसोबत खा 'ही' एक गोष्ट, लिव्हरसाठी गुणकारी, आजारही राहतील लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:00 IST

Liver Detox Home Remedy : आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी लिव्हरमधील टॉक्सिन बाहेर काढण्याचा एक खास उपाय सांगितला आहे.

Liver Detox Remedy: अलिकडे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल यामुळे लिव्हरच्या वेगवेगळ्या समस्या भरपूर वाढल्या आहेत. फॅटी लिव्हर ही त्यातील एक गंभीर समस्या आहे. यात लिव्हरवर फॅट कमी होऊ लागतं. लिव्हरवर सूज येते. लिव्हर डिटॉक्स करण्याचे म्हणजे लिव्हरची सफाई करण्याचे कितीतरी प्रॉडक्ट्स बाजारात अलिकडे आले आहेत. वेगवेगळे टॉनिक आले आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आपल्या किचनमध्ये काही नॅचरल उपाय असतात. आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी लिव्हरमधील टॉक्सिन बाहेर काढण्याचा एक खास उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद आणि ज्येष्ठमधाची गरज भासेल.

कसा मिळतो हळद आणि ज्येष्ठमधाचा फायदा?

श्वेता शाह सांगतात की, हळदीला आयुर्वेदात लिव्हर प्रोटेक्टर म्हटलं जातं. यातील करक्यूमिन नावाचं तत्व लिव्हरमधील विषारी तत्व बाहेर काढतं. तसेच एक्सपर्ट सांगतात की, हळद नियमितपणे खाल्ल्यास लिव्हरवरील सूज कमी होऊ शकते, पचनक्रिया मबजूत होते, बाइल ज्यूस वाढतो. ज्यामुळे फॅट्स सहजपणे डायजेस्ट होतात.

ज्येष्ठमधाचा फायदा

ज्येष्ठमधाच्या फायद्याबाबत न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, ज्येष्ठमधानं लिव्हरमधील उष्णता म्हणजेच पित्त शांत होतं. तसेच लिव्हरला झालेली इजाही यानं रिपेअर होते. सोबतच ज्येष्ठमध खाल्ल्यानं हार्मोन्स बॅलन्स करण्यासही मदत मिळते.

कसा कराल वापर?

श्वेता शाह यांच्यानुसार, हळद आणि ज्येष्ठमध मिळून लिव्हरची सफाई करतं. हळदीनं विषारी तत्व बाहेर पडतात, तर ज्येष्ठमध लिव्हरला शांत करण्यास मदत करतं. हा उपाय करण्यासाठी 1/2 चमचे हळदीत 1/4 चमचा ज्येष्ठमध पावडर घाला. हे तयार झालेलं मिश्रण एक ग्लास कोमट पाण्यात टाका. हे पाणी रोज सकाळी उपाशीपोटी नाश्ता करण्याआधी प्यावं.

श्वेता शाह यांच्यानुसार, हा उपाय आणि प्रभावी उपाय लिव्हर डिटॉक्स करण्यास खूप फायदेशीर ठरतो. हळद आणि ज्येष्ठमधाचा फार पूर्वीपासून आयुर्वेदात वापर केला जातो. अशात आपणही यांचा वापर सुरू केला तर शरीराला मोठा फायदा मिळू शकतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी