Stomach Gas Treatment: कामाच्या वाढलेल्या वेळा, वेळेवर जेवण न करणे, चुकीची लाइफस्टाईल आणि झोप पूर्ण न होणे यामुळे अनेकांना रोजच पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. अनेकांना काहीही खाल्ल्यावर लगेच छातीत जळजळ किंवा पोटात गॅसची समस्या होते. अशात ना कामात लक्ष लागत ना कशात. दिवसभर अस्वस्थ वाटतं. या समस्या दूर करण्यासाठी आधी यांची कारणं जाणून घेतली, तर जास्त बरं पडतं. कारण योग्य ते उपाय करता येतील. काहीही खाल्ल्यावर तुम्हाला गॅस किंवा अॅसिडिटी होत असेल तर आयुर्वेदाचे डॉ. रॉबिन शर्मा यांनी काही उपाय सांगितले आहेत.
काय म्हणाले डॉक्टर?
डॉ. रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी ही समस्या दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत. ते म्हणाले की, 'पोटात गॅस तयार होण्याचं मुख्य कारणं चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे काही सोप्या उपायांनी तुम्ही या समस्या दूर करू शकता.'.
गॅस- अॅसिडिटी दूर करणाऱ्या 3 सवयी
उपाशीपोटी प्या हे ड्रिंक
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी एका खास ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला आहे. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा सूंठ पावडर आणि एक छोटा तुकडा गूळ एक ग्लास पाण्यात उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्ध शिल्लक राहील तेव्हा गॅस बंद करा. पाणी गाळून कोमट पिऊ शकता.
डॉक्टर म्हणाले की, हे खास ड्रिंक पिऊन तुमची पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होणार नाही. तुम्हाला हवं तर हे ड्रिंक तुम्ही दिवसा जेवण झाल्यावरही पिऊ शकता.
दूध टाळा
डॉक्टर रॉबिन शर्मा यांच्यानुसार, तुम्हाला जर गॅसची समस्या जास्त असेल तर दूध आणि दुधापासून तयार पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तुम्ही तूप खाऊ शकता. कारण तुपानं सुद्धा पचन तंत्र मजबूत राहतं.
हींग
डॉक्टरांनी गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी हींग खाण्याचा सल्ला दिला आहे. जेवण तयार करताना त्यात थोडी हींग टाकावा.
डॉक्टर सांगतात की, या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर गॅस, अॅसिडिटी, पोट फुगण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.