Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय

डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय

Diabetes : डायबिटीस आजाराची देशातील स्थिती पाहता तुम्ही प्री-डायबिटीक असतानाच काही गोष्टींची काळजी घेऊन या आजाराचा धोका टाळू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:49 IST2025-05-29T10:04:22+5:302025-05-29T20:49:39+5:30

Diabetes : डायबिटीस आजाराची देशातील स्थिती पाहता तुम्ही प्री-डायबिटीक असतानाच काही गोष्टींची काळजी घेऊन या आजाराचा धोका टाळू शकता.

Ayurveda nutritionist shares best remedies to control blood sugar levels in both prediabetic and diabetic patients | डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय

डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय

Diabetes : हृदयरोग, कॅन्सर या आजारांची नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळे कसं नुकसान होत आहे किती लोकांची जीव जात आहे हेही लोकांना माहीत असतं. पण या आजारांपेक्षाही भयंकर एक आजार जो जगभरात सगळ्यात जास्त वेगानं वाढत आहे आणि भारत त्याची राजधानी आहे हे अनेकांना माहीत नाही. तो आजार म्हणजे डायबिटीस म्हणजेच मधुमेह. भारतात 7 पैकी एका व्यक्तीला डायबिटीस आहे. इतकंच नाही एका रिपोर्टमध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, 2050 सालापर्यंत डायबिटीसच्या रूग्णांमध्ये 73% वाढ होऊ शकते. हेच नाही तर देशात डायबिटीसनं जीव जाणाऱ्यांची संख्याही वाढल्याचं सांगण्यात येतं.

डायबिटीस हा एक असा आजार आहे जो मुळापासून नष्ट करता येत नाही. तो फक्त कंट्रोल करता येतो. डायबिटीस आजाराची देशातील स्थिती पाहता तुम्ही प्री-डायबिटीक असतानाच काही गोष्टींची काळजी घेऊन या आजाराचा धोका टाळू शकता. आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट डिंपल जांगडा यांनी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

प्री-डायबिटीज एक अशी स्थिती आहे ज्यात ब्लड शुगर लेव्हल सामान्यापेक्षा अधिक असते. पण इतकीही जास्त नसते की, याला टाइप 2 डायबिटीस म्हटलं जाईल. पण यामुळे डायबिटीसचा धोका नक्कीच राहतो. यात एक चांगली बाब ही आहे की, हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून प्री-डायबिटीजना ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल करता येऊ शकते.

ब्लड शुगर कमी करण्याचे उपाय

कारल्याचा ज्यूस

कारल्याचा ज्यूस डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान मानला जातो. याची टेस्ट कडवट नक्कीच आहे, पण यात चरेन्टिन आणि मोमोर्डिसिन नावाचे तत्व असतात, जे शरीरात इन्सुलिनचं काम करतात. हे तत्व तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास आणि तुमची इन्सुलिन सेन्सिटिविटी सुधारण्यास मदत करतात. न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, कारल्याचा ज्यूस तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी 30 दिवस प्यावा. यानं डायबिटीसमध्ये सुधारणा होईल. 

स्ट्रिंग बीन्सचा चहा 

स्ट्रिंग बीन्स म्हणजेच फरसबीच्या शेंगा शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात. या शेंगाचा चहा खूप प्रभावी ठरतो. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि आवश्यक व्हिटामिन असतात. जे पॅंक्रियाटिक हेल्थचा सपोर्ट करतात. या चहानं ग्लूकोज स्पाइक कमी करण्यास आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. या शेंगाचा चहा तयार करण्यासाठी 5 शेंगा घ्या आणि त्यांचे तुकडे करा. या शेंगा दीड कप पाण्यात उकडा आणि एक कप शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा. हे पाणी सकाळी उपाशीपोटी किंवा सायंकाळी 4 ते 5 वाजता पिऊ शकता.

मेथीच्या बिया

शुगर लेव्हल मॅनेज करण्यासाठी मेथीच्या बिया सुद्धा खूप फायदेशीर मानल्या जातात. मेथीच्या बियांमध्ये डायटरी फायबर असतं. या बियांमुळे तुमची भूक कंट्रोल होते, कोलेस्टेरॉल कमी होतं आणि सोबतच शुगरही कंट्रोल राहते. मेथीच्या बियांचं पाणी करण्यासाठी एक चमचा मेथीच्या बिया घ्या. या बिया एक कप पाण्यात उकडा. हे पाणी गाळून सकाळी उपाशीपोटी प्यावं. 

Web Title: Ayurveda nutritionist shares best remedies to control blood sugar levels in both prediabetic and diabetic patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.