Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवण झालं किंवा काहीही खाल्लं की आंबट-करपट ढेकर येतात? पाहा स्वयंपाकघरातलेच औषधी उत्तम उपाय

जेवण झालं किंवा काहीही खाल्लं की आंबट-करपट ढेकर येतात? पाहा स्वयंपाकघरातलेच औषधी उत्तम उपाय

Acidic Burps : आपल्याला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर यावर एक्सपर्टनी उपाय सांगितला आहे. पाहुया काय आहे उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:35 IST2025-07-10T10:10:44+5:302025-07-10T13:35:59+5:30

Acidic Burps : आपल्याला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर यावर एक्सपर्टनी उपाय सांगितला आहे. पाहुया काय आहे उपाय...

Ayurveda expert tells how to get rid of acidic burps with home remedies | जेवण झालं किंवा काहीही खाल्लं की आंबट-करपट ढेकर येतात? पाहा स्वयंपाकघरातलेच औषधी उत्तम उपाय

जेवण झालं किंवा काहीही खाल्लं की आंबट-करपट ढेकर येतात? पाहा स्वयंपाकघरातलेच औषधी उत्तम उपाय

Acidic Burps : जेवण झाल्यावर किंवा काही खाल्ल्यानंतर आंबट ढेकर येणं ही एक कॉमन समस्या आहे. आंबट ढेकरीचा संबंध लोक सामान्यपणे गॅस किंवा अपचनासोबत जोडतात. पण आयुर्वेदानुसार ही समस्या पचन अग्निमध्ये असंतुलन आणि आम्लता वाढल्याचा संकेत असतो. आंबट ढेकर येत असेल तर अस्वस्थ वाटू लागतं आणि कशातही लक्ष लागत नाही. आपल्याला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर यावर एक्सपर्टनी उपाय सांगितला आहे. पाहुया काय आहे उपाय...

आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रताप चौहान यांनी NDTV सोबत बोलताना सांगितलं की, जास्त उशीरा जेवण केल्यानं, जास्त तळलेले-भाजलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं किंवा सतत काहीतरी खात राहिल्यामुळे आंबट ढेकरेची समस्या होते. अनेकदा याचा त्रास अधिक असतो. मात्र, काही सोपे उपाय करून यापासून आराम मिळवता येऊ शकतो.

काय कराल उपाय?

डॉक्टर सांगतात की, जर आपल्याला पुन्हा पुन्हा आंबट ढेकर येत असेल तर एक चमचा जिरे पूड कोमट पाण्यात टाकून प्या. 

तसेच अर्धा चमचा बडीशेप आणि खडी साखर खाऊनही आंबट ढेकरेचा त्रास दूर करता येऊ शकतो. 

थोडा आल्याचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास गॅस आणि ढेकरेची समस्या कमी होऊ शकते.

त्याशिवाय नारळ पाणी किंवा मीठ न घालता ताक पिणंही फायदेशीर ठरू शकतं.

लाइफस्टाईलमध्ये बदल

आयुर्वेद डॉक्टरांनुसार, जर आपल्याला नेहमीच आंबट ढेकर येत असेल तर लाइफस्टाईलमध्ये थोडा बदल करणं गरजेचं ठरतं. यासाठी रोज वेळेवर जेवण करा, जास्त मसालेदार-तेलकट खाऊ नका आणि जेवणानंतर लगेच झोपणं टाळा. तसेच जेवण केल्यावर थोडा वॉक करा, यानं पचन चांगलं होण्यास मदत मिळते. या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तरी गॅस, अपचन, आंबट ढेकर या समस्या दूर करता येऊ शकतात.

Web Title: Ayurveda expert tells how to get rid of acidic burps with home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.