Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोरडा आणि ओला खोकला झटक्यात दूर करतं अननस, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

कोरडा आणि ओला खोकला झटक्यात दूर करतं अननस, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

Cough Treatment : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा यांच्यानुसार, सर्दी-खोकला दूर करण्यासाठी नेहमीच सिरप किंवा इतर औषधांचा वापर योग्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:08 IST2025-01-16T11:07:33+5:302025-01-16T11:08:13+5:30

Cough Treatment : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा यांच्यानुसार, सर्दी-खोकला दूर करण्यासाठी नेहमीच सिरप किंवा इतर औषधांचा वापर योग्य नाही.

Ayurveda Dr told pineapple can treat cough know how to eat | कोरडा आणि ओला खोकला झटक्यात दूर करतं अननस, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

कोरडा आणि ओला खोकला झटक्यात दूर करतं अननस, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला सोपा उपाय!

Cough Treatment : हिवाळ्यात खोकला होणं ही एक सामान्य बाब आहे. कारण थंड वातावरणात श्वसन तंत्रावर जास्त प्रभाव पडतो. हिवाळ्यात खोकला थंड हवा, सर्दी, कोरडी हवा, एलर्जी आणि इन्फेक्शनमुळे होतो. सर्दी-खोकला झाल्यावर तुम्ही इतरही समस्या होतात जसे की, घशात सतत खवखव आणि जळजळ, कोरडा किंवा कफ असलेला खोकला, श्वास घेण्यास समस्या, घशात खाज आणि रात्री जास्त खोकला येणे.

आयुर्वेद डॉक्टर दीक्षा यांच्यानुसार, सर्दी-खोकला दूर करण्यासाठी नेहमीच सिरप किंवा इतर औषधांचा वापर योग्य नाही. पुढे जाऊन या औषधांनी अनेक नुकसान होतात. तुम्ही लगेच आराम मिळवण्यासाठी खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपायही करू शकता.

खोकल्यावर प्रभावी ठरतं अननस

डॉक्टरांनी सांगितलं की, त्या अनेकदा जास्त खोकला झाल्यावर अननस खातात आणि दरवेळी अननस प्रभावी काम करतं. अननस खोकल्यावर औषधासारखं काम करतं. कारण यात ब्रोमेलिन नावाच एक महत्वाचं तत्व असतं.

अननसानं खोकला कसा दूर होतो?

डॉक्टरांनी सांगितलं की, यात आढळणारं ब्रोमेलिन खोकला कमी करण्यास मदत करतं. या तत्वामुळे सूज कमी होते, कफ पातळ होतो, खोकला कमी होतो आणि श्वास घेण्यासंबंधी समस्याही दूर होते.

खोकला असताना कसं आणि किती खावं अननस?

खोकला असताना दिवसातून तीन स्लाइस अननस खावं. तसेच तुम्ही एक ग्लास अननसाचा ताजा रसही पिऊ शकता. या रसात तुम्ही मध, मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून पिऊ शकता.

हळद आणि मिठाचं पाणी

२५० ते ३०० मिली पाणी घ्या, त्यात एक मोठा चमचा हळद टाका आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी उकडून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्यानं गुरळा करा. दिवसातून तीन वेळा हा उपाय करू शकता. घशातील खवखव आणि खाज यानं दूर होईल.

Web Title: Ayurveda Dr told pineapple can treat cough know how to eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.