जर तुमचे दात सतत किडत असतील हिरड्यांमधून रक्त येत असेल जर दातांचे आरोग्य खराब असल्याचे हे संकेत असू शकतात. दातांमध्ये टार्टर, प्लाक जमा झाल्यास कॅव्हिटीज होण्याचा धोका असतो. दातांच्या समस्या असतील तर लोक महागड्या टुथपेस्ट, माऊथ जेल, डेंटल क्लिनिंग आणि दुसऱ्या महागड्या गोष्टींकडे पळू लागतात. ज्यामुळे हजारो रुपये खर्च होतात. डॉक्टर सलिम जैदी सांगतात, दांत आणि हिरड्यांच्या समस्यांसाठी तुम्ही नॅच्युरल आणि आयुर्वेदीक उपाय करू शकता. ३० ते ४० सेकंद दातांवर तुम्ही हे घरी बनवलेलं मिश्रण लावून ठेवू शकता ज्यामुळे दात चमकदार दिसतील. (Ayurveda Dr Saleem Zaidi Share Triphala Mouthwash Recipe To Get Rid Of Cavity)
डॉक्टर सांगतात की बाहेरचे सर्व उपाय दातांच्या समस्यांवर मुळापासून काम करत नाहीत. फक्त लक्षणांना काही वेळासाठी दाबून टाकते. तोंडात बॅक्टेरियांची एक कॉलनी असते. यात चांगले, वाईट, दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियाजमुळे संतुलन बिघडते आणि दातात कॅव्हिटीज तयार होतात. हिरड्यांमध्ये सूज आणि रक्त येऊ लागतं. दातांची सेंसिटिव्हीटी वाढते आणि तोंडातून दुर्गंध येत नाही.
पाय दुखेपर्यंत चालता पण पोट कमीच होईना? वॉकनंतर 5 गोष्टी करा, पटकन बारीक व्हाल
दात का किडतात?
डॉक्टर सांगतात की लोक सांगतात दातांमध्ये किड लागते. त्याला कॅव्हिटीज असं म्हणतात जेव्हा आपण काहीही गोड खातो तेव्हा बॅक्टेरिया साखरेला एसिडमध्ये बदलवतात. ज्यामुळे दातांचे इनॅमल खराब होते. हिरड्यांना सूज, ब्लिडींग होते.
त्रिफला माऊथ वॉश
त्रिफला माऊथ वॉश बनवण्याासठी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घ्या. त्यात 200 मिली पाणी घाला. 2 ते 3 मिनिटं हे पाणी उकळवून घ्या. नंतर गॅस बंद करा. जेव्हा पाणी कोमट होईल तेव्हा गाळून हे पाणी थंड होऊ द्या. हे पाणी एका ग्लासात भरून व्यवस्थित गुळण्या करा. 30 ते 40 सेकंद तोंडाच्या चारही बाजूंनी फिरवा. पूर्ण ग्लास याच पद्धतीनं संपवा.
केस खूपच गळताहेत-भांग विरळ दिसतो? 'हे' घरगुती ड्रिंक प्या, मुळापासून घनदाट होतील केस
हा उपाय केल्यानं ब्लिडींग गम्स, दु्र्गंध, कॅव्हिटीजची समस्या उद्भवणार नाही. दिवसभरातून 2 वेळा तुम्ही हे उपाय करू शकता. दिवसातून २ वेळा हा उपाय केल्यास त्रिफळा तोंडातील हानीकारक बॅक्टेरिजायची वाढ रोखण्यास मदत करतो. ज्यामुळे कॅव्हिटज होत नाहीत. तसंच हिरड्या घट्ट होण्यासही मदत होते.
