Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज दोनदा भात खाल्ला तरी ना शुगर वाढणार ना वजन; डॉक्टर सांगतात भात 'असा' शिजवा...

रोज दोनदा भात खाल्ला तरी ना शुगर वाढणार ना वजन; डॉक्टर सांगतात भात 'असा' शिजवा...

Ayurveda Dr Kapil Told Which Rice Is Best For Diabetes : काहीजण शुगर वाढण्याच्या भितीनं भात आवडत असूनही अजिबातच खात नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:28 IST2025-08-24T14:16:56+5:302025-08-24T14:28:30+5:30

Ayurveda Dr Kapil Told Which Rice Is Best For Diabetes : काहीजण शुगर वाढण्याच्या भितीनं भात आवडत असूनही अजिबातच खात नाहीत.

Ayurveda Dr Kapil Told Which Rice Is Best For Diabetes Patients And How To Cook Rice | रोज दोनदा भात खाल्ला तरी ना शुगर वाढणार ना वजन; डॉक्टर सांगतात भात 'असा' शिजवा...

रोज दोनदा भात खाल्ला तरी ना शुगर वाढणार ना वजन; डॉक्टर सांगतात भात 'असा' शिजवा...

डायबिटीसच्या (Diabetes) आजारावर अजूनही कोणते ठोस उपचार नाहीत. ब्लड शुगर वाढल्यानंतर वेळीच नियंत्रणात आणली नाही तर शरीराचं गंभीर नुकसान होऊ शकतं. डायबिटीस असल्यावर भात खाऊ शकतो की नाही असा अनेकांचा प्रश्न असतो. काहीजण शुगर वाढण्याच्या भितीनं भात आवडत असूनही अजिबातच खात नाहीत. याबाबत डॉ. कपिल त्यागी यांनी अधिक माहिती दिली आहे. (Ayurveda Dr Kapil Told Which Rice Is Best For Diabetes Patients And How To Cook Rice)

डॉक्टर सांगतात की भात कार्बोहायड्रेट्सनी परीपूर्ण असतो. डायबिटीसमध्ये कोणता भात खावा ते समजून घ्यायला हवं. डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरा भात खाणं टाळायला हवं कारण यात फायबर्स कमी असतात. तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता यात फायबर्स जास्त असतात. फायबर्स हळूहळू पचतात ज्यामुळे ब्लड शुगर वाढत नाही.

डॉक्टर सांगतात इंसुलिन घेणार्‍या रुग्णांना माहीत असायला हवं की त्यांनी किती प्रमाणात कार्ब्स घेतले आहे. एकत्र कार्ब्स घेतल्यानं शुगर वेगानं वाढतं. शुगरच्या रुग्णांनी कार्ब्स छोट्या छोट्या भागांमध्ये खायला हवेत. ग्लायसेमिक इंडेक्स सांगतो की जेवण किती वेगानं शुगर वाढवतं. जर कोणत्याही अन्नाचा ग्लाससेमिक इंडेक्स 70 पेक्षा जास्त असेल तर शुगर त्वरीत वाढते. ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स 68 आहे.

डॉक्टर सांगतात की डायबिटीसच्या रुग्णांनी नेहमी कमी प्रमाणात म्हणजे 1/3 कप शिजवलेला ब्राऊन राईस खायला हवा. याशिवाय भाज्या, डाळी खा जेणेकरून पोषण संतुलित राहील. तांदळासोबत तुम्ही क्विनोआ, कोबी खाऊ शकता. यामुळे प्रोटीन्स आणि फायबर्स वाढतात. हे खाल्ल्यानं शुगर लेव्हल 100 पेक्षा जास्त वाढत नाही.

दातांना कीड लागून काळी छिद्रही पडली? ‘या’ पावडरनं १ मिनिट दात घासणं फायद्याचं

डायबिटीसच्या रुग्णांनी भात कसा शिजवावा?

डॉक्टर सांगतात की डायबिटीस असेल आणि भात खात असाल तर त्यातील स्टार्च काढून टाका. प्रोटीनयुक्त पदार्थांसोबत भात खा. आधी तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याचं प्रमाण तांदळापेक्षा तीनपट जास्त हवं (Ref). जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा तांदूळ घाला आणि जवळपास ५ ते ६ मिनिटं शिजवा.

नंतर त्यावर फेस किंवा पांढरे पदार्थ तरळू लागतील. यालाच स्टार्च म्हणतात. तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत पाणी उकळू द्या. नंतर गॅस बंद करून उरलेलं स्टार्टचं पाणी गाळून घ्या. नंतर झाकण ठेवून वाफेवर १० मिनिटं ठेवा. हा पौष्टीक भात तुम्ही नेहमी खाऊ शकता. असा  हेल्दी भात खाल्ल्यानं तुमचं वजनही नियंत्रणात राहील किंवा ही प्रक्रिया तुम्हाला किचकट वाटत असेल तर तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता.

Web Title: Ayurveda Dr Kapil Told Which Rice Is Best For Diabetes Patients And How To Cook Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.