Cholesterol Reduce Remedy: बॅड कोलेस्टेरॉल शरीरात जमा होणारा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात एक म्हणजे गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. पण हेच जर वाढलं तर ते बॅड कोलेस्टेरॉल असतं जे हृदयासाठी खूप घातक असतं. आजकाल भरपूर लोकांना बॅड कोलेस्टेरॉलची समस्या होत आहे. याला कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं.
चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे जसं बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढतं, तसं काही खास गोष्टी खाऊन याला कंट्रोलही केलं जाऊ शकतं. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी अशाच एक नॅचरल ड्रिंकबाबत सांगितलं आहे.
काय म्हणाले डॉक्टर?
डॉक्टर जैदी यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, जर तुमचं कोलेस्टेरॉल वाढलं असेल आणि औषधांशिवाय कमी करायचं असेल तर तुम्ही चार गौष्टींची एक स्मूदी तयार करून पिऊ शकता. या स्मूदीनं शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत मिळते.
काय लागेल साहित्य?
स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 कप ताजी पालक लागेल. एक मध्यम आकाराचं केळ घ्या. एक छोटा चमचा फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया घ्या. अर्धा कप ताजं दही घ्या.
या सगळ्या गोष्टी एका मिक्सरमध्ये टाका आणि स्मूदी तयार करा. गोडवा हवा असेल तर यात तुम्ही एक छोटा चमचा मधही टाकू शकता.
कसा मिळतो फायदा?
पालक
डॉक्टर जैदी सांगतात की, पालकात फायबर भरपूर असतं, ज्यामुळे आतड्यांमध्ये जमा कोलेस्टेरॉलचं अवशोषण कमी होतं आणि शरीरात जमा अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर निघतं.
केळ
केळ्यांमध्ये फायबरसोबतच पोटॅशिअमचं प्रमाणही भरपूर असतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.
दही
दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पचन तंत्र मजबूत राहतं, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
अळशीच्या बिया
अळशीच्या बिया शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप फायदेशीर असतं. या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.
डॉक्टर जैदी यांच्यानुसार यांनी सांगितलं की, ही स्मूदी तुम्ही रोज एकदा सकाळी नाश्त्याआधी आणि नंतर एकदा दुपारच्या जेवणाआधी पिऊ शकता. 1 ते 2 महिने नियमितपणे ही स्मूदी प्याल तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.