Join us

बराच वेळ बसून आणि जोर लावूनही साफ होत नाही पोट? एकदा करून बघाच हे 3 आयुर्वेदिक उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:10 IST

Natural Remedy for Constipation: जर तुम्हाला सुद्धा नेहमीच ही समस्या होत असेल आणि यावर सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

Natural Remedy for Constipation: बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होण्याची समस्या आजकाल कॉमनच झाली आहे. पोट जर व्यवस्थित साफ झालं नाही तर जडपणा तर वाटतोच, सोबतच अस्वस्थही वाटू लागतं. यामुळे सुस्तपणा आणि चिडचिडपणाही वाढतो. इतकंच नाही तर कोणत्या कामात मनही लागत नाही. सुस्त लाइफस्टाईल, अनहेल्दी फूड्स खाणं, तणाव आणि पाणी कमी पिणं या कारणांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत असल्याचं क्सपर्ट्स सांगतात. जर तुम्हाला सुद्धा नेहमीच ही समस्या होत असेल आणि यावर सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, 'आयुर्वेदात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अनेक नॅचरल आणि सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. जर रोज सकाळी तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही तीन सोपे उपाय करू शकता'.

काय आहेत हे तीन उपाय?

ओवा आणि गुळाचं पाणी

डॉक्टरांनी सांगतात की, ओव्यामध्ये थायमोल नावाचं एक तत्व असतं, जे पचनासाठी आवश्याक एंझाइम्सना सक्रिय करतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं. तसेच गुळानं शरीर नॅचरल पद्धतीनं डिटॉक्स होतं, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी एक चमचा ओवा आणि गुळाचा एक छोटा तुकडा पाण्यात उकडा. जेव्हा हे पाणी अर्ध शिल्लक राहील तेव्हा ते गाळून कोमट प्या.

भिजवलेला मनुका

मनुक्यांमध्ये पचनास मदत करणारं फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि यात लॅक्सेटिव गुणही असतात. फायबर आणि लॅक्सेटिव गुण आतड्यांना सक्रिय बनवतात. ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. हा उपाय करण्यासाठी रात्री एक चमचा मनुका एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्या आणि मनुका चावून खा. अशाप्रकारे मनुका नियमित खाल तर बद्धकोष्ठतेची समस्या नेहमीची दूर होईल.

अळशीच्या बियांचं चूर्ण

अळशीच्या बियांमध्ये डायटरी फायबर आणि ओमेग-3 फॅटी अॅसिड असतं. जे आतड्यांमध्ये चिकटपणा आणतात. ज्यामुळे पोट सहजपणे साफ होण्यास मदत मिळते. यासाठी एक चमचा अळशीच्या बियांचं चूर्ण गरम दूध किंवा पाण्यात टाकून रात्री झोपण्याआधी प्यावं. असं केल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स