Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कच्चा लसूण आणि मध एकत्र करुन खाण्याचे ५ फायदे, तज्ज्ञांनी सांगितला अनोखा उपाय

कच्चा लसूण आणि मध एकत्र करुन खाण्याचे ५ फायदे, तज्ज्ञांनी सांगितला अनोखा उपाय

Garlic And Honey Benefits : आयुर्वेदात एक खास उपाय आहे. तो म्हणजे सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण आणि मध एकत्र खाण्याचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:02 IST2025-08-28T11:15:40+5:302025-08-28T14:02:48+5:30

Garlic And Honey Benefits : आयुर्वेदात एक खास उपाय आहे. तो म्हणजे सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण आणि मध एकत्र खाण्याचा.

Ayurved doctor tells eat garlic and honey on an empty stomach and how to eat it | कच्चा लसूण आणि मध एकत्र करुन खाण्याचे ५ फायदे, तज्ज्ञांनी सांगितला अनोखा उपाय

कच्चा लसूण आणि मध एकत्र करुन खाण्याचे ५ फायदे, तज्ज्ञांनी सांगितला अनोखा उपाय

Garlic And Honey Benefits : आयुर्वेद हा आरोग्याचा खजिना मानला जातो. यात असे अनेक उपचार सांगण्यात आलेत, ज्यांचा तब्येत चांगली ठेवण्यास फायदा मिळतो. आपणही अनेकदा सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याच्या फायद्यांबाबत वाचलं असेल. पण आयुर्वेदात असाच एक वेगळाही उपाय आहे. तो म्हणजे सकाळी उपाशीपोटी कच्चा लसूण आणि मध एकत्र खाण्याचा. याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी या उपायाचे जबरदस्त असे फायदे सांगितलेत.

लसूण आणि मध खाण्याचे जबरदस्त फायदे

इम्यूनिटी वाढते

डॉक्टर सांगतात की, लसूण आणि मध या दोन्ही गोष्टींमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-व्हायरल गुण असतात. त्यामुळे या गोष्टी नियमित खाल्ल्यास इम्यूमिनी बूस्ट होते, अशात नेहमी नेहमी आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो. तसेच सर्दी-खोकला, व घशाच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

पचन तंत्र मजबूत राहतं

लसणामुळे पचन तंत्र मजबूत होतं आणि गॅस, अपचन, ब्लोटिंग अशा समस्याही दूर होतात. तर मध एक नॅचरल प्रीबायोटिक आहे, जे आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया वाढवतात. अशात उपाशीपोटी लसूण आणि मध खाणं पोटासाठी खूप फायदेशीर ठरतं.

सर्दी-पडसा टळेल

डॉक्टर जैदी सांगतात की, हे मिश्रण छातीत जमा झालेला कफ काढण्यास खूप मदत करतं. तसेच घशातील खवखव सुद्धा यानं दूर होते. बऱ्याच दिवसांपासून खोकला येत असेल त्यावरही हा उपाय रामबाण ठरेल.

हृदय राहतं निरोगी

लसणाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यानं शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. यानं धमण्यांची सफाई होते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांसाठी हा उपाय फायदेशीर मानला जातो.

अ‍ॅंटी-एजिंग

आरोग्याला तर या मिश्रणाचे फायदे होतातच, सोबतच त्वचेला सुद्धा होतात. मध आणि लसणामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीराला आतून तरूण ठेवण्याचं काम करतात. जर उपाशीपोटी या दोन गोष्टी नियमित खाल्ल्या तर त्वचेवरील ग्लो सुद्धा वाढू शकतो.

कसं खाल मिश्रण?

हे मिश्रण तयार करण्यासाठी लसणाच्या काही कळ्या सोलून एका काचेच्या बरणीत टाका आणि वरून मध टाका. लसणाच्या कळ्यात त्यात पूर्ण बुडायला हव्यात. ही बरणी 7 ते 10 दिवस रूम टेप्रेचरवर ठेवा. ठरलेल्या वेळेनुसार, रोज सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 कळ्या चावून खा.

कुणी टाळावा हा उपाय?

- डॉक्टरांनी सांगितलं की, या उपायाचे जरी अनेक फाये असले तरी काही लोकांनी हा उपाय टाळला पाहिजे. म्हणजे 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी हे खाऊ नये.

- डायबिटीसच्या रूग्णांना हा उपाय करणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

- जे लोक रक्त पातळ होण्याचं औषध घेत आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा उपाय करू नये.

- तसेच ज्यांना सतत अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ असते, त्यांनी सुद्धा हा उपाय टाळला पाहिजे.

Web Title: Ayurved doctor tells eat garlic and honey on an empty stomach and how to eat it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.