lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान मुलांना चहा देता? त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतात ४ वाईट परिणाम- आहारतज्ज्ञ सांगतात....

लहान मुलांना चहा देता? त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतात ४ वाईट परिणाम- आहारतज्ज्ञ सांगतात....

Side Effects Of Giving Tea To Children: तुम्हीही तुमच्या लहान मुलांना चहा देत असाल तर एकदा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत ते वाचा...(is it good to give tea to kids?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2023 11:36 AM2023-12-29T11:36:13+5:302023-12-29T11:36:58+5:30

Side Effects Of Giving Tea To Children: तुम्हीही तुमच्या लहान मुलांना चहा देत असाल तर एकदा आहारतज्ज्ञ याविषयी काय सांगत आहेत ते वाचा...(is it good to give tea to kids?)

Avoid giving tea to your kids for these major reasons, is it good to give tea to kids? Side effects of giving tea to children | लहान मुलांना चहा देता? त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतात ४ वाईट परिणाम- आहारतज्ज्ञ सांगतात....

लहान मुलांना चहा देता? त्यांच्या तब्येतीवर होऊ शकतात ४ वाईट परिणाम- आहारतज्ज्ञ सांगतात....

Highlightsचहामध्ये मुलांच्या दृष्टीने कोणतेही पोषणमुल्य नसते. त्यामुळे लहान मुलांना चहा देणं पुर्णपणे टाळलं पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.  

कधी कधी सहज म्हणून किंवा कधी कधी खूप थंडी असली की काही पालक मुलांना चहा देतात. काही घरांमध्ये तर हिवाळ्यात, पावसाळ्यात थंड वातावरण असतं म्हणून मुलांना गरम गरम चहा दिला जातो. एकदा मुलांना चहाची चव कळाली की मग त्यांना तो नेहमीच प्यावा वाटतो आणि मग मुलांचं सकाळ- संध्याकाळ पालकांसोबत चहा पिणं सुरू होतं (Avoid giving tea to your kids for these major reasons). तुम्हीही मुलांना अशा पद्धतीने चहा देत असाल तर त्याचा त्यांच्या तब्येतीवर कसा परिणाम होऊ शकतो, हे बघा (is it good to give tea to kids?).आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मुळीच चहा देऊ नये..(Side effects of giving tea to children)

 

लहान मुलांना चहा देण्याचे दुष्परिणाम

लहान मुलांना चहाची सवय लागली तर त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात, याची माहिती harlenezhealthclinic या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

मुग्धा आणि गौतमीच्या मंगळसूत्राचे पाहा सुरेख डिझाइन्स

१. चहामध्ये टॅनिन tannins असते. अन्नपदार्थांमधील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये टॅनिन अडथळा निर्माण करते. त्यामुळे मग लहान मुलांना लोहाची कमतरता जाणवते. त्यामुळे बऱ्याचदा चहा पिणारी लहान मुलं ॲनिमिक किंवा अशक्त असल्याचं दिसून येतं. 

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम

२. लहान मुलं पाणी कमी पितात. कारण खेळण्याच्या नादात त्यांना पाणी पिण्याचं लक्षात राहात नाही. त्यामुळे बहुतांश लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होत असतो. त्यात जर मुलं चहा पित असतील तर त्यांना इतर मुलांच्या तुलनेत वारंवार लघवीला जावं लागतं. आणि त्यांचा डिहायड्रेशनचा त्रास वाढतो. कारण चहामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे हा त्रास असतो.

 

३. चहा मध्ये कॅफिनही काही प्रमाणात असते. यामुळे मुलांना अस्वस्थ होणं, रात्री लवकर झोप न येणं, एन्झायटी किंवा चंचलपणा वाढणं असा त्रासही होऊ शकतो.

न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीही घेऊ शकता आलियासारखा हा वन पीस, कारण त्याची किंमत आहे.....

४. चहामधील काही घटकांमुळे मुलांना कमी वयातच वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो. चहामध्ये मुलांच्या दृष्टीने कोणतेही पोषणमुल्य नसते. त्यामुळे लहान मुलांना चहा देणं पुर्णपणे टाळलं पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.  


 

Web Title: Avoid giving tea to your kids for these major reasons, is it good to give tea to kids? Side effects of giving tea to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.