Join us

३ पदार्थ विसरुन जा, आरोग्यासाठी अत्यंत त्रासदायक! झपाट्याने वाढतं शरीरातील कोलेस्टेरॉल- हृदयविकाराचा धोकाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 11:26 IST

Bad cholesterol: heart attack: food can increase heart attack risk: food can increase bad cholesterol: What foods are worst for cholesterol: What foods reduce bad cholesterol: heart attack symptoms: cholesterol symptoms: जर तुम्ही देखील हे ३ पदार्थ सतत खात असाल तर वाढू शकते शरीरातील कोलेस्टेरॉल...

हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकसारखे भयानक आजार आपल्याला हल्ली वारंवार ऐकायला मिळतात. अगदी लहान वयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या अनेक बातम्या आपण नेहमी ऐकतो. (food can increase heart attack risk)वय वाढल्यानंतर खूप कमी प्रमाणात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती. परंतु सध्या वयाची तिशी ओलांडल्यानंतरही हृदयविकाराच्या धोक्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. (What foods are worst for cholesterol)

हृदयविकार किंवा स्टोकसारखे आजार हे अनुंवाशिक असतात किंवा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होतात. हल्ली तरुण पिढीला जंक फूड, तेलाचे पदार्थ, बदलेली जीवनशैली,ताण आणि अपुरी झोप यामुळे हृदयावर परिणाम होतो. यामुळे अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं.(heart attack symptoms) हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रकारे आहार घेणं तितकच महत्त्वाचं आहे. परंतु जर आहारात जास्त प्रमाणात चरबीयुक्त पदार्थ खात असाल तर त्यामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. 

पब्लिक टॉयलेट वापरताय? ४ चुकांमुळे वाढतो युरिन इन्फेक्शनचा धोका, पोटदुखीचा त्रासही अधिक

बाजारात किंवा ऑनलाइन साइट्सवर काही असे पदार्थ आहेत जे आपल्या नैसर्गिक आणि पौष्टिक असल्याचे सांगतात. परंतु त्यात असणारे घटक आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही देखील हे ३ पदार्थ सतत खात असाल तर वेळीच थांबा.

1. रिफाइंड तेल 

आपल्या स्वयंपाकघरात वापरले जाणारे तेल हे हृदयासाठी अतिशय धोक्याचे आहे. या तेलामध्ये आढळणारे घटक हे चरबी ट्रायग्लिसराइडची पातळी वाढवतात. तसेच शरीरात सूज किंवा जळजळ वाढवण्याचे काम करतात. रिफाइंड तेलावर अनेक प्रकारच्या प्रक्रियेतून जावं लागतं ज्यामुळे तेलातील पोषक घटक नष्ट होतात. रिफाइंड तेलांमध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असतं जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. ज्यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. 

2. बिस्किटे 

ओट्स, तूप, गूळ आणि इजर आरोग्यदायी घटकांपासून बनवलेले आणि फायबरने समृद्ध असल्याचा दावा करणारे हेल्दी बिस्किटे किंवा डायजेस्टिव्ह बिस्किट आरोग्याला हानिकारक ठरु शकतात. अशा बिस्किटांमध्ये अनहेल्दी चरबी असते. ज्यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढू शकते. ज्यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. 

3. पॅकबंद फूड 

अनेकांना सकाळी नाश्त्यात पॅकबंद फळांचा रस किंवा फूड खायला आवडतात. या प्रकारच्या ज्यूसमध्ये अधिक प्रमाणात साखर आणि फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते. जे शरीरात पोहोचल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी, लठ्ठपणा आणि खराब कोलेस्टेरॉल वाढवण्याचे काम करतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना