Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मेंदूला 1.6 वर्ष अधिक म्हातारं करतात आर्टिफिशिअल स्वीटनर, संशोधनातून धक्कादायक खुलासा

मेंदूला 1.6 वर्ष अधिक म्हातारं करतात आर्टिफिशिअल स्वीटनर, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Artificial Sweetener Side Effects : साखरेचे आपलेच काही नुकसान असतात, त्यामुळे ते टाळण्यासाठी बरेच लोक आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करून स्वत:ला केवळ दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:18 IST2025-09-06T12:17:05+5:302025-09-06T12:18:57+5:30

Artificial Sweetener Side Effects : साखरेचे आपलेच काही नुकसान असतात, त्यामुळे ते टाळण्यासाठी बरेच लोक आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करून स्वत:ला केवळ दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. पण...

Artificial Sweetener Side Effects : Brain become 1 point 6 years more old by over using artificial sweeteners says study | मेंदूला 1.6 वर्ष अधिक म्हातारं करतात आर्टिफिशिअल स्वीटनर, संशोधनातून धक्कादायक खुलासा

मेंदूला 1.6 वर्ष अधिक म्हातारं करतात आर्टिफिशिअल स्वीटनर, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Artificial Sweetener Side Effects :  बरेच लोक आजकाल साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर अधिक करू लागले आहेत. आर्टिफिशियल स्वीटनरची चव भलेही चांगली लागत असेल, पण यानं आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. ब्लड शुगर लेव्हल  वाढणे, वजन वाढणे या समस्या मुख्य आहेत. साखरेचे आपलेच काही नुकसान असतात, त्यामुळे ते टाळण्यासाठी बरेच लोक आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करून स्वत:ला केवळ दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक याकडे स्टेटसचा भाग म्हणून पाहतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आर्टिफिशिअल स्वीटनर आपल्या कॉगनिटिव्ह हेल्थला वेगानं म्हातारं करत आहे.

न्यूरोलॉजी (Neurology) जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, आर्टिफिशिअल स्वीटनरच्या एका गंभीर धोक्याबाबत माहिती मिळाली. या गोष्टीला आपण हेल्दी मानता, कारण ही गोष्टी लो कॅलरी शुगर सब्सीट्यूट आहे. पण यातील तत्वांमुळे कॉगनिटिव्ह डिकलाइनचा (Artificial Sweetener Making Brain 1.6 Years Older) धोका वाढतो.

शोधात 8 वर्षाच्या कालावधीमध्ये 12, 700 पेक्षा जास्त वयस्कांवर लक्ष ठेवण्यात आलं आणि अॅस्पार्टेम, सॅकरीन, एसेसल्फेम-के, एरिथ्रिटोल, जायलिटोल, सोर्बिटोल आणि टॅगॅटोज सारख्या स्वीटरनवर लक्ष ठेवण्यात आलं. सामान्यपणे आर्टिफिशियल स्वीटनर कथितपणे हेल्थ फूड्स जसे की, दही, फ्लेवर्ड वॉटर, डाएट सोडा आणि कमी कॅलरी असलेल्या मिठाईंमध्ये वापरले जातात. कोण काय वापरतं त्यानुसार सहभागी लोकांना विभागण्यात आलं होतं.

काय आलं समोर?

शोधातून समोर आलं की, जे लोक जास्त स्वीटनरचा वापर करत होते, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये आणि विचार करण्याच्या क्षमतेमध्ये कमतरता दिसून आली. शोधात एका डाएट सोडासोबत तुलना करण्यात आली आणि यावर जोर दिला की, जे लोक सगळ्यात जास्त डाएट सोडा रोज पितात, त्यांच्यात 62 टक्के वेगानं कॉगनिटिव्ह डिकलाइन येतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू 1.6 वर्ष अधिक म्हातारा होतो.

याचा नेमका अर्थ काय आहे?

या समस्येचा अर्थ असा होतो की,  हेल्दी समजले जाणारे फूड, ड्रिंक्स मग ते डाएट सोडा असो किंवा फ्लेवर्ड पैकेज्ड योगर्ट यांचा वापर कमी केला पाहिजे. स्वीटनरमध्ये रेग्युलर शुगर इतक्या कॅलरी नसतात, पण याचा अर्थ असा नाही की, यापासून नुकसान होत नाही आणि कशाचाही विचार न करता यांचा वापर करू शकता. स्वीटनरनं कॅलरी कमी करण्यास मदत मिळते. पण इतरही गंभीर नुकसान असतात.

Web Title: Artificial Sweetener Side Effects : Brain become 1 point 6 years more old by over using artificial sweeteners says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.